शी जिनपिंग तिसऱ्यांदा चीनच्या राष्ट्राध्यक्षपदी

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे पुन्हा सत्तेत येणार हे जवळपास निश्चित असताना आता तिसऱ्यांदा शी जिनपिंग हे पुन्हा सत्तेत आले आहेत.

शी जिनपिंग तिसऱ्यांदा चीनच्या राष्ट्राध्यक्षपदी

गेले काही दिवस चीनच्या राजकारणात मोठ्या हालचाली सुरू होत्या. तसेच कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना काँग्रेसचे २० वे अधिवेशन देखील सुरू होते. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे पुन्हा सत्तेत येणार हे जवळपास निश्चित असताना आता तिसऱ्यांदा शी जिनपिंग हे पुन्हा सत्तेत आले आहेत. त्यांची पुन्हा अध्यक्षपदी निवड झाली आहे. अपेक्षेप्रमाणे त्यांची सलग तिसऱ्यांदा पक्षाच्या सरचिटणीसपदी निवड झाली आहे. तर चीनमध्ये या पदासाठी निवडलेला नेता देशाचा राष्ट्रपती असतो आणि पीपल्स लिबरेशन आर्मी (PLA) चा कमांडर देखील असतो.

शी जिनपिंग हे तिसऱ्यांदा चीनचे राष्ट्राध्यक्ष बनल्याने पक्षाची तीन दशके जुनी राजवटही मोडीत निघाली आहे. चीनमध्ये १९८० नंतर सर्वोच्च पदावर १० वर्षांच्या कार्यकाळाचा नियम करण्यात आला होता. मात्र, जिनपिंग यांना आणखी पाच वर्षे सत्तेवर ठेवण्यासाठी २०१८ मध्ये हा नियम बाजूला ठेवण्यात आला. त्यामुळे चीनच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या अध्यक्षाला तिसऱ्यांदा या पदावर कायम राहता येणार आहे.

हे ही वाचा:

पुणे रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत एकाचा मृत्यू

इस्रोची दिवाळी भेट, सर्वात वजनदार रॉकेटचे पहिले व्यावसायिक प्रक्षेपण यशस्वी

रितेश, जीनिलीयाच्या कंपनीवर मेहेर नजर का?

ठाकरेंचे खोके, एकदम ओके; खोक्यांचा धुरळा आता कोर्टात

यावेळी २०५ सदस्यांची पक्षाची मध्यवर्ती समितीही जाहीर झाली. पक्षानं या समितीतून प्रधानमंत्री ली केकियांग, उपप्रधानमंत्री हान झेंग यांच्यासह इतर दोघांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.  ग्रेट हॉल ऑफ द पीपलमध्ये पक्षाच्या आठवडाभर चाललेल्या २० व्या राष्ट्रीय काँग्रेसमध्ये त्यांनी रविवारी कम्युनिस्ट पक्षाच्या सरचिटणीसपदाची सूत्रे स्वीकारली. यावेळी शी जिनपिंग यांनी त्यांच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल संपूर्ण पक्षाचे मनापासून आभार मानले.

Exit mobile version