चीनमध्ये गाड्यांवर पावसातून पडला किडींचा ढीग?

चीनमध्ये गाड्यांवर पावसातून पडला किडींचा ढीग?

कोरोनासाठी चीन कसा कारणीभूत आहे, याची चर्चा गेले काही वर्षे सुरू आहे. त्यामुळे सध्या जगभरात कोणताही व्हायरस निर्माण झाला तर त्याचा संबंध चीनशी जोडला जातो. आता चीनमधील काही गाड्यांवर किडे पडल्याचा व्हीडिओ व्हायरल होत असून त्यामुळे पुन्हा एकदा चीन चर्चेत आला आहे. या व्हीडिओमध्ये कार या किड्यांनी भरलेली दिसत आहे. त्यावरून लोकांनी वेगवेगळ्या चर्चा सुरू केल्या आहेत. हा व्हीडिओदेखील खूप व्हायरल झाला आहे.

चीनमध्ये पावसामधून या किडी सर्वत्र पडत असल्याचे म्हटले आहे. त्यात तीन चार कार या किडींनी भरलेल्या आहेत असे दिसते आहे. न्यूयॉर्कमध्ये यासंदर्भातील पोस्ट व्हायरल झाली. त्यात बीजिंग शहरात या किडी गाड्यांवर पडल्या आहेत असे म्हटले आहे. बोटभर लांबीच्या या किडी त्या गाड्यांवर दिसत आहेत आणि कुणीतरी तो व्हीडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.

हे ही वाचा:

१२ मार्च १९९३ : काला साबून कोकणातील शेखाडीत उतरला पण त्याने फेस आणला, कारण…

१२ मार्च १९९३: १० हजार पानी आरोपपत्र, १०० दोषी, १४ फाशी

ईडीच्या कारवाईमुळे आठवला वाल्या कोळी

धावत्या रिक्षावर १७व्या मजल्यावरून पडला लोखंडी रॉड आणि…

त्या कारच्या बाजूने एक माणूस छत्री घेऊन चालताना दिसत आहे. किडे आपल्या अंगावर पडू नये म्हणून त्याने छत्री धरली आहे का, असा प्रश्नही त्यातून निर्माण होतो आहे.

मदर नेचर नेटवर्क या वैज्ञानिक नियतकालिकाने आपल्या वेबसाईटवर म्हटले आहे की, जोरदार वाहात असलेल्या वाऱ्यामुळे कदाचित हे किडे तिथे पडले असतील. वाऱ्यामुळे जे वादळ निर्माण होते त्यात किडे सापडले असतील आणि वाऱ्यासोबत वाहात आले असतील.

चीनमधील पत्रकार शिवै यांनी म्हटले आहे की, हा व्हीडिओ फेक आहे. असा कोणताही पाऊस बीजिंगमध्ये पडलेलाच नाही. या काळात बीजिंगमध्ये पाऊस पडतच नाही.

काही लोकांनी या व्हीडिओखाली प्रतिक्रिया लिहिताना ही झाडाची पाने असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे एकूणच या व्हीडिओविषयी वेगवेगळी मतमतांतरे व्यक्त होत आहेत. मात्र किडीसदृश काहीतरी गाड्यांवर दिसत असल्यामुळे त्याची खूप चर्चा झाली आहे.

Exit mobile version