जगातील पहिला SMS बोलू लागला लाखांची बोली!

जगातील पहिला SMS बोलू लागला लाखांची बोली!

१९९२ साली जगातील पहिला संदेश (SMS) पाठवण्यात आला होता. हा एसएमएस वोडाफोन कर्मचाऱ्याने एका दुसऱ्या कर्मचाऱ्याला पाठवला होता. ” मेरी ख्रिसमस ” असा मजकूर त्यात लिहला होता. आता या जगातील आगळ्यावेगळ्या पहिल्या एसएमएसचा लिलाव झाला आहे.

हा पहिला मजकुर पॅरिसच्या लिलावगृहात ‘नॉन-फंगीबल टोकन’ म्हणून तब्बल एक लाख ७० हजार युरोमध्ये लिलाव झाला.
डेली मेल मध्ये दिलेल्या वृत्तानुसार, ब्रिटिश प्रोग्रामर नील पापवर्थ ( Neil papworth ) यांनी २९ वर्षांपूर्वी म्हणजेच ३ डिसेंबर १९९२ हा जगातील पहिला संदेश पाठवला होता. त्या पहिल्या एसएमएसचा वोडाफोन कंपनीने लिलाव केला आहे. हा लिलाव परिसमधील अगुटेक ऑक्शन हाऊस येथे झाला.

वोडाफोनने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, लिलावातून जी काही रक्कम मिळेल ती युएन रिफ्युज एजन्सीला दिली जाणार आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, जगातील पहिल्या एसएमएस नंतर ११९५ पर्यंत, दरमहा सरासरी ०.४ टक्के लोक टेस्ट मेसेज पाठवत होते.

हे ही वाचा:

धक्कादायक! महाराष्ट्रातील २४ हजार महिला गायब

पेंग्विन बाळाच्या बारशात मश्गुल असणाऱ्यांना बालमृत्युंचे सोयरसुतक नाही!

आदित्य ठाकरे धमकीप्रकरणी एकाला अटक; एसआयटी नेमणार

भारताच्या शत्रूंवर कोसळणार ‘प्रलय’

 

नील पापवर्थ हे वोडाफोनमध्ये एक डेव्हलपर आणि टेस्ट इंजिनिअर म्हणून काम करत होते. त्यावेळी त्यांनी संगणकावरून हा एसएमएस त्यांचे दुसरे सहकारी रिचर्ड जावरीस यांना पाठवला होता. तेव्हा रिचर्ड हे कंपनीचे संचालक होते. रिचर्ड यांनी हा एसएमएस त्यांच्या दोन किलो वजनाच्या ऑर्बिटल 901 हॅण्डसेटवर प्राप्त केला होता. २०१७ मध्ये नील पापवर्थ म्हणाले होते की, जेव्हा १९९२ मध्ये पहिला एसएमएस पाठवला तेव्हा तो तितका लोकप्रिय होईल याची कल्पनाही त्यांना नव्हती.

Exit mobile version