जगातील सर्वात वयोवृद्धाचा वयाच्या ११२ व्या वर्षी मृत्यू…

जगातील सर्वात वयोवृद्धाचा वयाच्या ११२ व्या वर्षी मृत्यू…

जगातील सर्वात वयोवृद्ध माणूस, स्पॅनिश सॅटर्निनो दे ला फुएन्टे गार्सिया यांचे काल वयाच्या ११२ वर्षी निधन झाले. डे ला फुएन्टे यांचे वायव्य स्पेनमधील लिओन शहरात त्यांच्या घरी निधन झाले. अशी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने आज माहिती दिली आहे.

गार्सिया हे ११२ वर्षे २११ दिवसांचे झाल्यावर त्यांना जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती म्हणून घोषित करण्यात आले होते. पुढच्या महिन्यात त्यांचा ११३ वा वाढदिवस साजरा होणार होता. मात्र त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. काल निधन झाले तेव्हा त्यांचे वय ११२ वर्षे ३४१ दिवस होते.

त्यांचा जन्म ११ फेब्रुवारी १९०९ रोजी पोन्टे कॅस्ट्रो, लिओन येथे झाला होता. वयाच्या १३ व्या वर्षपासून त्यांनी एका बुटाच्या कारखान्यात काम करण्यास सुरवात केली होती. वयाच्या २७ व्या वर्षी १९३६ मध्ये त्यांनी गृहयुद्धात लढण्यासाठी मसुदा तयार करणे टाळले त्याऐवजी त्यांनी स्वतःचा सैन्यासाठी बूट तयार करण्याचा व्यवसाय सुरु केला. आणि ते त्या भागातील एक प्रसिद्ध कारागीर बनले. त्यांची उंची फारशी नव्हती.

गार्सियाची आणखी एक आवड म्हणजे त्याला सॉकर खेळणे आवडायचे. तो लिओनच्या कल्चरल लिओनेसा संघाचा समर्थक होता आणि पुएन्टे कॅस्ट्रोच्या स्थानिक सॉकर संघाची सह-स्थापनाही त्याने केली होती. १९१८ मध्ये स्पॅनिश फ्लू पसरला होता. त्या पसरलेल्या साथीच्या आजारापासून ते वाचले होते. १९३३ मध्ये त्याचे अँटोनिनासोबत लग्न झाले होते. त्यांना आठ मुलांसह १४ नातवंडे आणि २२ पतवंडे आहेत.

हे ही वाचा:

कोविड विरोधी लसीकरणात भारताने ओलांडला आणखीन एक महत्त्वाचा टप्पा

मुलायम परिवारातही आता भा’जप’

लंडनच्या आलिशान घरातून विजय मल्ल्याला काढणार बाहेर

पर्यटन बंद झाले आणि थायलंडमध्ये माकडांनी शहरांत घातला धुमाकूळ

 

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने गेल्या वर्षी गार्सियाचा ११२ वा वाढदिवस साजरा करणारा एक टिकटॉक व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यावेळी सन्मानपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले होते. त्यांना आज स्थानिक स्मशानभूमीत दफन करण्यात येणार आहे. गिनीज वेबसाइटनुसार, आतापर्यंतची गार्सियाआधीची सर्वात वृद्ध व्यक्तीची नोंद फ्रान्सची जीन लुईस कॅलमेंट होती, ज्यांचा वयाच्या १२२ व्या वर्षी १९९७ मध्ये मृत्यू झाला होता. त्यांचा जन्म फेब्रुवारी १८७५ मध्ये झाला होता.

Exit mobile version