अहमदाबाद आणि सुरतेत धावणार मेट्रो

अहमदाबाद आणि सुरतेत धावणार मेट्रो

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडियो कॉन्फरन्सिंग द्वारे अहमदाबाद मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे आणि सुरत येथील मेट्रोचे भूमिपूजन केले.

या मेट्रोंमुळे अहमदाबाद आणि सुरतमधील लोकांना सार्वजनिक वाहतूकीसाठी वेगवान पर्याय उपलब्ध होईल. या प्रसंगी बोलताना मोदी म्हणाले की हा या दोन शहरांसाठी महत्त्वाचा दिवस आहे.

ऑनलाईन माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, गुजरातचे गव्हर्नर आचार्य देवव्रत, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी आणि केंद्रीय गृहनिर्माण आणि शहर विकास मंत्री हरदीप सिंग पूरी हे देखील उपस्थित होते.

पंतप्रधान भाषणात काय म्हणाले?

अहमदाबाद मेट्रो रेल्वे प्रकल्प

अहमदाबाद मेट्रोचा दुसरा टप्पा २८.२५ किमी लांबीचा असेल. हा टप्पा दोन कॉरिडॉरमध्ये विभागलेला आहे. मोटेरा स्टेडियम ते महात्मा मंदिर या पहिल्या कॉरिडॉरची लांबी २२.८ किमी आहे. गुजरात नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी (जीएनएलयु) ते गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक (जीआयएफटी) हा दुसरा कॉरिडॉर ५.४ किमी लांबीचा आहे. या एकूण प्रकल्पाची किंमत ₹५,३८४ कोटी आहे.

सुरत मेट्रो प्रकल्प

सुरत मेट्रोची लांबी ४०.३५ किमी आहे. याचा पहिला कॉरिडॉर २१.६१ किमी लांबीचा आहे आणि तो सार्थाना ते ड्रीम सीटी असा आहे. तर १८.७४ किमी लांबीचा दुसरा कॉरिडॉर भेसाना ते सरोली असा आहे. या प्रकल्पाची एकूण किंमत ₹१२,०२० कोटी आहे.

Exit mobile version