अफगाणिस्तानमधील महिलांचे ब्युटी सलून बंद होणार

तालिबान्यांनी काढला फतवा

अफगाणिस्तानमधील महिलांचे ब्युटी सलून बंद होणार

साधारण दोन वर्षांपूर्वी तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर कब्जा मिळवत तेथील नागरिकांवर जाचक निर्बंध लादले. प्रामुख्याने त्यांनी महिलांवर निर्बंध घातले. अफगाणिस्तानमध्ये सत्तांतर होताच तालिबानने आधी सांगितले की, “मुलींना शाळेत जाऊ देणार. महिलांना पूर्वी सारखेच आयुष्य जगता येणार.” मात्र, काही दिवसांतचं त्यांनी पलटी खात नागरिकांवर निर्बंध लावण्याचे फतवे काढले.

त्यानंतर तालिबान्यांनी फतवा काढत ब्युटी पार्लर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता अफगाणिस्तानमधील महिलांचे ब्युटी सलून बंद होणार आहेत. देशाची राजधानी काबुलसह अन्य प्रांतांमध्येही हा नियम लागू करण्यात आला आहे. तालिबानच्या मंत्रालयातील प्रवक्ता मोहम्मद आकिफ महाजरने टोलो न्यूजला याबाबत माहिती दिली. शिवाय, महिलांचे ब्युटी सलूनचे असलेले लायसन्स रद्द करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

तालिबानच्या या निर्णयामुळे महिलांमध्ये नाराजी पसरली असून अनेक महिलांचे घर त्यांच्या कमाईत चालत असल्यामुळे आता कमाईचे साधन गेल्यामुळे उपाशी राहायचे का असा सवाल महिलांनी उपस्थित केला आहे.

हे ही वाचा:

उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा लागू करण्याच्या हालचाली

एटीएम फोडणाऱ्या तिघांना अटक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय देशाला पर्याय नाही

नरेंद्र मोदींनी दहशतवादावरून पाकिस्तानला सुनावले खडेबोल

“इथले पुरूष बेरोजगार आहेत. अशा परिस्थितीमध्ये महिलांनाच घर चालवावं लागत आहे. यासाठी त्या ब्युटी पार्लरमध्ये काम करतात. मात्र आता महिलांचे पार्लर बंद केले आहेत, तर आम्ही काय करायचं?” अशी चिंता मेकअप आर्टिस्ट रेहान मुबारिज यांनी व्यक्त केली आहे. तालिबानने महिलांच्या शिक्षणावर, सरकारी ऑफिसमध्ये काम करण्यावर, पुरूषांसोबत काम करण्यावर बंदी लागू केली आहे. तसेच पार्क, सिनेमा आणि इतर मनोरंजक ठिकाणी जाण्यास देखील महिलांना बंदी आहे.

Exit mobile version