…म्हणून अफगाणिस्तानमध्ये वाढली ‘पुरुषां’ची संख्या

…म्हणून अफगाणिस्तानमध्ये वाढली ‘पुरुषां’ची संख्या

अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या शासनानंतर तिकडच्या महिलांचे जगणे अत्यंत कठीण झाले आहे. महिलांना सर्वच क्षेत्रात तालिबान्यांनी बंधने घातली आहेत. शिक्षण, नोकरी या सर्वच क्षेत्रात तालिबान्यांनी बंधने लादली आहेत. महिलांनी केवळ नात्यातल्या पुरुषासोबत बाहेर जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे एकल माता आणि घटस्फोटित महिलांना कुठेही जाणे कठीण झाले आहे. यामधून मार्ग म्हणून अफगाण महिलांनी नवा मार्ग शोधून काढत पुरुषांचे कपडे घालून या महिला घराबाहेर पडत आहेत.

अफगाणिस्तानमधील महिला असे धोकादायक पाऊल उचलत आहेत. मात्र त्यांचा नाईलाज असून त्यांना अत्यावश्यक कामांसाठी बाहेर पडावे लागत असल्याने त्या पुरुषांच्या पोशाखात घराबाहेर पडत आहेत. मात्र, महिलांची ओळख पटल्यास त्यांना फाशीची शिक्षा होऊ शकते.

हे ही वाचा:

दादा काय सांगता…वाईन म्हणजे दारू नाही?

आश्चर्य!!! सहा महिने बेशुद्ध राहून कोरोनावर केली मात

‘सुपर मार्केटमधून दारू विकण्याऐवजी प्राथमिक सुविधा द्या’

… म्हणून क्रिकेटपटू पीटरसनने मोदींना लिहिले हिंदीतून पत्र

राबिया या अफगाण महिला म्हणाल्या की, अफगाणिस्तानमध्ये एक महिला असणे कठीण आहे. त्यातही एकट्या आईसाठी हे आणखी वाईट आहे. तालिबानचे शासन आल्यानंतर ते आणखी कठीण झाले आहे. त्यांनी सांगितले की, तालिबानने टॅक्सी चालकांना महिलेला एकटे वाहनात बसवू नका असे आदेश दिले आहेत. त्यामुळे या कठीण परिस्थितीत विरोध करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पुरुषांचे कपडे घातलेले काही फोटो काढून ते सोशल मीडियावर पोस्ट केले. ज्यात लिहिले होते, “मी एक स्त्री आहे.” तिचे फोटो काही तासांतच व्हायरल झाले आणि इतर स्त्रिया देखील पुरुषांच्या पोशाखात स्वतःचे फोटो पोस्ट करून तिच्या ऑनलाइन निषेधात सामील झाल्याचे राबिया यांनी सांगितले. ‘आम्हाला तालिबानला दाखवायचे आहे की ते आमचा आवाज दाबू शकत नाहीत,’ असे राबिया म्हणली.

Exit mobile version