आज जागतिक महिला दीना निमित्त गूगल ने खास डूडल तयार केले आहे. आज संपूर्ण जगात इंटरनेट सर्च इंजिन म्हणून गूगलचे व्यासपीठआपण ओळखत आहोत. यामध्ये वेगवेगळे आकर्षक रंगसंगतीचे डूडल वेळोवेळी अनेकांचे लक्ष वेधून घेतात.यावर्षी गूगल डूडल ची संकल्पना हि ‘वूमन सपोर्टींग वूमन’अशी आहे. त्यामुळेच जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून गूगलने विविध क्षेत्रातील महिलांना या दिनानिमित्त मानवंदना दिली आहे. आणि या डुडलच्या निमित्ताने त्यांचा गूगल चे डूडल करून गौरव केला आहे.
दरवर्षी जगभरात आठ मार्च हा ‘जागतिक महिला दिन’ म्हणून आपण साजरा करतो. समाजातील सर्वच क्षेत्रातील सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतीत या स्तरातील महिलांच्या कामगिरीचा गौरव करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. म्हणूनच गूगलचे हे खास डूडल केले आहे. या डूडल मध्ये ग्रह , ताऱ्यांचे निरीक्षण करणाऱ्या महिला दिसत आहेत, तर एक महिला भाषण करत असून तिच्यासोबत काही महिला या आंदोलनात सहभागी झालेल्या दिसत आहेत. तर एका बाजूला एक जेष्ठ महिला वैद्यकीय क्षेत्रात काम करताना दिसत आहेत. तुम्ही जर का या डूडल वर क्लीक केलेत तर स्क्रीनवर तुम्हाला अनेक महिलांचे हात दिसतील आणि त्यांच्या हातात तुम्हाला निळ्या आणि जांभळ्या रंगांचे झेंडे दिसतील. क्लीक करून नक्की बघा.
हे ही वाचा:
औरंग्या बुडाला पण पिलावळीचं काय?
आनंद द्विगुणित करणारा रंगांचा सण “होळी”
आरएसएसच्या पुढाकाराने गर्भात वाढणारे बाळ शिकणार ‘भारतीय संस्कृती’
इम्तियाज जलील यांच्याविरोधात भाजप रस्त्यावर
डूडल कलाकाराने व्यक्त केल्या भावना
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने गूगलच्या डूडल बनवणाऱ्या कलाकार ‘एलिसा विनान्स’ यांनी आपल्या डूडल बद्दल भावना व्यक्त केल्या आहेत. यावर्षी गूगल डूडल ची संकल्पना हि ‘वूमन सपोर्टींग वूमन’अशी आहे.
जाणून घेउया महिला दिनाचा इतिहास
न्यूयॉर्कमध्ये आठ मार्च १९०८ साली वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री कामगारांनी एकत्रितपणे मोठी ऐतिहासिक निदर्शने केली होती. कामाच्या जागी सुरक्षितता आणि दहा तासांचा कामाचा दिवस अशा मागण्या केल्या आहेत. याशिवाय लिंग, वारणा, शैक्षणिक आणि मालमत्ता पार्श्वभूमी निरपेक्ष सर्व च स्त्री पुरुष यांना मतदानाचा हक्क मिळावा अशा मागण्या हि केल्या होत्या. अमेरिकन कामगार स्त्रियांच्या या व्यापक कृतीमुळे क्लारा झेटकिन या अतिशय प्रभावित झालया होत्या. कोपनहेगन इथे १९१० साली दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत आठ मार्च १९०८ साली अमेरिकेतल्या स्त्री कामगारांनी केलेल्या त्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ आठ मार्च हा ‘जागतिक महिला दिन’ म्हणून स्वीकारावा असा क्लारा यांचा ठराव मंजूर झाला. भारतात मुंबई मध्ये प्रथमच महिला दिन हा आठ मार्च १९४३ साली पहिल्यांदा साजरा करण्यात आला होता.