35 C
Mumbai
Tuesday, November 5, 2024
घरदेश दुनियातालिबानींना ताकद दाखविण्यासाठी अफगाणी महिला रस्त्यावर

तालिबानींना ताकद दाखविण्यासाठी अफगाणी महिला रस्त्यावर

Google News Follow

Related

१५ ऑगस्टला तालिबान्यांनी काबूलवर कब्जा करून अफगाणिस्तानमध्ये सत्ता मिळवली. सत्ता पालटानंतर अफगाणिस्तानमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुरुवारी पश्चिम अफगाणिस्तानमधील हेरात या शहरात काही अफगाणी महिला तालिबान्यांविरोधात आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरल्या होत्या. महिलांना अजून काही अधिकार आणि सरकारमध्ये महिलांचा समावेश या मागण्यांसाठी महिलांनी ‘घाबरू नका’ अशा संदेशाचे फलक घेऊन आंदोलन केले.

तालिबान्यांच्या सत्तेपूर्वी हेरात शहरातील अनेक तरुणी विद्यापीठात शिक्षण घेत असत तसेच कामानिमित्त घराबाहेरही पडत असत. तालिबान्यांनी काही दिवसांपूर्वीच महिला शिक्षण घेऊ शकतील, मात्र त्या पुरुषांबरोबर एकत्र शिक्षण घेऊ शकणार नाहीत, असा फतवा काढला होता. तालिबान्यांनी त्यांच्या मागच्या सत्तेच्या कारकिर्दीत महिलांना शिक्षणाला आणि बहुतांश सार्वजनिक ठिकाणी बंदी घातली होती, त्यामुळे आताही महिलांना अधिकार मिळतील या तालिबान्यांच्या वक्तव्यावर कोणालाही विश्वास नाही. आम्हाला आमची ताकद तालिबान्यांना दाखवायची आहे. आम्ही घरी बसून राहिलो तर आमची ताकद त्यांना दिसणार नाही आणि ते अजून बंधन आमच्यावर लादतील, असे आंदोलनाची आयोजक मारयम हिने सांगितले.

हे ही वाचा:

वसूलीखोर ठाकरे सरकार उद्योग विरोधी

पॅरालिम्पिक २०२०: प्रवीण कुमारने विक्रमी कामगिरी करत पटकावले रौप्य पदक

ठाकूर तो छा गियो

घरात जुन्या नोटा, बँकेत लाखो रुपये

तालिबान्यांच्या सरकारमध्ये महिलांना स्थान नसेल, असे वक्तव्य तालिबान नेता मोहम्मद अबास स्तानेक्झाई याने बीबीसी ला दिले आणि त्यानंतर महिलांनी हेरातमध्ये आंदोलनाला सुरुवात केली. महिलांचा सरकारमध्ये समावेश हाच आंदोलनाचा मुख्य उद्देश आहे. आम्ही आता शांत बसणार नाही. महिलांचा गट आंदोलन करून तालिबान्यांना सरकारमध्ये महिलांना प्रवेश द्यायला लावेल, अशी आशा आहे. हा लढा शेवटपर्यंत सुरू राहील, असे मानवाधिकार कार्यकर्ता बसिरा यांनी सांगितले.

आंदोलन करणाऱ्या महिला ‘शिक्षण, काम आणि सुरक्षा हे आमचे अविभाज्य अधिकार आहेत’ असे लिहिलेले फलक हातात पकडून घोषणा करत होत्या. त्यांच्या या आंदोलनाचा सर्व ३४ प्रांतात विस्तार करण्याची महिलांची योजना आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
187,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा