29 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरदेश दुनियाकसलं काय? तालिबान सरकारच्या दोन वर्षांत महिलांचे झाले वाटोळे!

कसलं काय? तालिबान सरकारच्या दोन वर्षांत महिलांचे झाले वाटोळे!

अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे सरकार पुन्हा आले तेव्हा सर्वांत आधी महिला आणि मुलींच्या अधिकारांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.

Google News Follow

Related

अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकारला १५ ऑगस्ट रोजी दोन वर्षे पूर्ण झाली. सन २०२१मध्ये जेव्हा तालिबान सत्तेत आले होते, तेव्हा त्यांनी किती तरी आश्वासने दिली होती. तसेच, महिलांची परिस्थिती आणि शिक्षणाच्या संदर्भात आमचा दृष्टिकोन बदलला असल्याचे आश्वासनही त्यांनी आंतरराष्ट्रीय समूहाला दिले होते. मात्र त्यांनी त्यांचा कट्टर स्वभाव सोडलेला नाही, हेच अधोरेखित झाले आहे. ते आता शरियत या इस्लामिक कायद्यानुसार, सरकार चालवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगत आहेत.

महिला-मुलींची कोंडी

अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे सरकार पुन्हा आले तेव्हा सर्वांत आधी महिला आणि मुलींच्या अधिकारांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. तालिबानचे सर्वोच्च नेता हिबतुल्ला अखुंदज्दा यांनी महिलांच्या आयुष्यात बदल करण्याचा दावा केला होता. मात्र वास्तवात असे झाले नाही. ज्या दिवशी परदेशी सैन्यांनी अफगाणिस्तानची भूमी सोडली, त्याच दिवसापासून येथील महिलांना हिजाब अनिवार्य करण्यात आला. या नियमांची आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप टीका झाली. संयुक्त राष्ट्रानेही याबाबत तालिबान सरकारकडे नाराजी दर्शवली.

 

हे ही वाचा:

विनयभंग प्रकरणी स्वयंघोषित राष्ट्रसंत एकनाथ लोमटेला अटक !

वांद्रे रेल्वे स्थानकाबाहेर लव्ह जिहादच्या संशयावरून तरुणाला मारहाण

चांद्रयानाचा चंद्राच्या शेवटच्या कक्षेत यशस्वी प्रवेश

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची राम कथेला हजेरी

सर्वसामान्य नागरिकही त्रस्त

अफगाण सरकारच्या अर्थसंकल्पापैकी सुमारे ८० टक्के निधी आंतरराष्ट्रीय समूहाकडून येत होता, असे सांगितले जाते. मात्र तालिबानने आपल्या विचारांत बदल न केल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरून मिळणारी मदत बंद झाली. त्यामुळे रुग्णालये, शाळा, सरकारी मंत्रालये आणि कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कपात केली गेली आहे. त्यात सर्वसामान्य नागरिकांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होऊ लागली आहे. अफगाणिस्तानात सलग तिसऱ्या दिवशी दुष्काळ पडला आहे. त्यामुळे तालिबानने चीन आणि कझाकिस्तानसारख्या देशांशी मदतीसाठी संपर्क साधला आहे.

 

पाकिस्तानचीही डोकेदुखी वाढली

अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकार आल्यानंतर सर्वांत जास्त अडचण पाकिस्तानची झाली आहे. पाकिस्तान तालिबानला गुरूस्थानी मानते. मात्र त्यांनी पाकिस्तानवर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. तालिबानशासित अफगाणिस्तान पाकिस्तानवर हल्ला करण्यासाठी दहशतवाद्यांना आश्रय देत आहे, असा आरोप याच जुलैमध्ये पाकिस्तानने तालिबानवर केला होता. त्यामुळे पाकिस्तानात रक्तपात वाढला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा