25 C
Mumbai
Friday, November 22, 2024
घरदेश दुनियाचहाबिस्किटे देत आजीबाईंचा दहशतवाद्यांशी ‘लढा’

चहाबिस्किटे देत आजीबाईंचा दहशतवाद्यांशी ‘लढा’

६५ वर्षीय रेशेल एड्री यांची कहाणी

Google News Follow

Related

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी आपल्या एक दिवसाच्या इस्रायलभेटीदरम्यान ७ ऑक्टोबर रोजी हमास दहशतवाद्यांच्या नृशंस हल्ल्यातून बचावलेल्या नागरिकांची भेट घेतली. त्यातल्याच एक होत्या, ६५ वर्षीय रेशेल एड्री. त्यांना दहशतवाद्यांनी बंदुकीचा धाक दाखवत त्यांच्या घरातच ओलिस ठेवले होते.

 

तब्बल २० तास घरात असलेल्या या आजीबाईंनी इस्रायली सैन्य येईपर्यंत या दहशतवाद्यांना चहा आणि कुकी खाऊ घालून त्यांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांन बुधवारी ज्यूवासींचे राष्ट्र असलेल्या इस्रायलला भेट दिली. तसेच, ७ ऑक्टोबर रोजी हमासने केलेल्या दहशतवादी हल्ल्यातून बचावलेल्या काही नागरिकांची भेटही घेतली. हमासच्या दहशतवाद्यांनी गाझा पट्टीची सीमा ओलांडून इस्रायलमध्ये घुसखोरी केली. त्यातील पाच दहशथवादी राशेल एड्री आणि तिचे पती डेव्हिड यांच्या घरात घुसले होते.

 

 

या दहशतवाद्यांनी या दाम्पत्याला मारहाण केली नाही, मात्र ते ‘हुतात्मा’ होणार आहेत, असे त्यांना सांगत होते. जेव्हा इस्रायलचे सुरक्षा दल आहे, तेव्हा दहशतवाद्यांच्या हातात ग्रेनेड होते. त्यांनी त्यातील पिन काढून रेशेलच्या डोक्यावर फेकली. हे दाम्पत्य सुरक्षा दलाशी चर्चा करत असल्यामुळे त्यांनी त्यांना ठार मारण्याची धमकी दिली.

 

 

इस्रायलच्या सुरक्षा दलाला जेव्हा हे दहशतवादी घरात असल्याचे कळले तेव्हा ते या घरावर बॉम्ब फेकणार होते. मात्र हे घर इस्रायली लष्करातील एका सैनिकाच्या पालकांचे असल्याचे आणि तेही या घरात असल्याचे समजल्यावर सैन्यदलाने आपला निर्णय बदलला. इस्रायली सुरक्षा दल दहशतवाद्यांशी चर्चा करत असताना रेशेल या दहशतवाद्यांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत होत्या. ‘ते खूप संतप्त होते. त्यामुळे मी त्यांना सतत भूक लागली आहे का, असे विचारायचे. मी त्यांच्यासाठी कॉफी आणि कूकी तयार केल्या,’ असे रेशेल यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले.

हे ही वाचा:

‘वीर सावरकर, सिक्रेट फाईल्स’ या वेबसिरीजमधून सावरकरांचा जीवनपट उलगडणार

ऋषी सुनक इस्रायलमध्ये दाखल; पोहचताच व्यक्त केल्या भावना

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनी राष्ट्रपतींच्या गावी पोहचणार रेल्वे

पुण्यातील ज्वेलर्स आयकर विभागाच्या रडारवर

 

‘दहशतवाद्यांना सतत काही हवे-नको आहे का, याबाबत विचारपूस करत तिने दहशतवाद्यांना गोंधळात टाकले,’ असे रेशेलचे पती डेव्हिड सांगतात. रेशेलने एका जखमी दहशतवाद्याच्या हाताला मलमपट्टीही केली आणि त्याचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याशी सतत संवाद साधून रेशेल यांनी दहशतवाद्यांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला. ‘मी हे सर्व काही जिवंत राहण्यासाठीच केले. जोपर्यंत आमचे सैन्य आमच्या सुटकेसाठी येत नाही, तोपर्यंत मला हे करणे भाग होते,’ असे रेशेल सांगतात. जेव्हा इस्रायलचे सुरक्षा दल त्यांच्या घरात घुसले तेव्हा डेव्हिड यांनी त्यांच्या पत्नीच्या रक्षणासाठी त्यांच्या अंगावर उडी मारली. ‘त्यांनी आमचे ४० वर्षांचे लग्न वाचवले,’ असे रॅशेल सांगतात.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा