30 C
Mumbai
Saturday, January 4, 2025
घरदेश दुनिया'मोदी यांच्या भूमिकेमुळे जागतिक संकट टळले'

‘मोदी यांच्या भूमिकेमुळे जागतिक संकट टळले’

आजचे युग युद्धाचे नाही, असे मोदींनी पुतिन यांना सांगितले होते.

Google News Follow

Related

रशिया युक्रेन युद्धात अण्वस्त्र वापराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेमुळेच जागतिक संकट टळले,असे प्रतिपादन अमेरिकेच्या केंद्रीय गुप्तचर संस्थेचे संचालक विल्यम बर्न्‍स यांनी केले आहे.

विल्यम बर्न्‍स यांनी पब्लिक ब्रॉडकािस्टग सव्‍‌र्हिसच्या (पीबीएस) मुलाखतीत बोलत होते. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष जिनपिंग यांनी अण्वस्त्रांच्या वापराबद्दल चिंता व्यक्त केली होती. त्याचा पुतिन यांच्यावर परिणाम झाला, असे मला वाटते. अण्वस्त्र वापराच्या धमकीमागे भीती दाखवण्याचा उद्देश होता, पण आजच्या घडीला अण्वस्त्र वापराची योजना रशियाकडे असल्याचा कोणताही थेट पुरावा मला आढळत नाही, असेही बर्न्‍स यांनी नमूद केले.

रशिया युक्रेन युद्धामध्ये चर्चेद्वारे तोडगा काढण्याची भारताने वेळोवेळी भूमिका मांडली होती. भारताच्या या आवाहनामुळे पुतिन यांनी युक्रेन संघर्षांबाबतची भूमिका पंतप्रधान मोदी यांच्याशी झालेल्या चर्चेत स्पष्ट केली होती. सप्टेंबरमध्ये शांघाय सहकार्य संघटनेच्या परिषदेच्या वेळी दोन्ही नेत्यांमध्ये प्रत्यक्ष चर्चाही झाली होती. आजचे युग युद्धाचे नाही, असेही मोदी यांनी पुतिन यांना सांगितले होते.

हे ही वाचा:

चुकीच्या विधानामुळे किरण रिजिजूनी राहुल गांधींना फटकारले

६० दिवस २२ पोलिस घेत आहेत मुलीचा शोध

हिजाबला विरोध करणाऱ्या ऑस्कर विजेत्या अभिनेत्रीला अटक

मुंबईत कार आणि एसयूव्हीच्या नोंदणीत ३६ टक्क्यांनी वाढ

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी पुतीन यांच्यामध्ये वारंवार फोनवरून चर्चा झाली होती. या चर्चेत नरेंद्र मोदी यांनी रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष थांबवण्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरी हाच एकमेव मार्ग असल्याचे सांगितले होते. आजचे युग युद्धाचे नाही, असेही मोदी यांनी पुतिन यांना सांगितले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा