२०२४ मध्ये पुन्हा ट्रम्प?

२०२४ मध्ये पुन्हा ट्रम्प?

निवडणुकांनंतरच्या पहिल्या जाहीर सभेतून दिले संकेत

अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष पदावरून पायउतार होऊन अजून दोन महिनेही लोटलेले नाहीत, तरी ट्रम्प यांनी २०२४ सालच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा उडी घेण्याचे संकेत दिले आहेत.ट्रम्प यांनी रविवारी एक जाहीर सभा घेतली, राष्ट्राध्यक्ष पदावरून पायउतार झाल्यानंतरची ही त्यांची पहिलीच जाहीर सभा होती. या सभेत ते असं म्हणाले की, अमेरिकेचा आत्मा टिकवण्यासाठीचा आपला लढा आहे.

ऑरलॅंडोमध्ये झालेल्या या सभेत त्यांनी पुन्हा एकदा २०२० सालच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत झालेल्या गैरव्यवहाराचा आणि घोटाळ्यांचा उल्लेख केला. नोव्हेंबर २०२० मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये तत्कालीन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. निवडणुकीचे निकाल हाती यायला सुरवात होताच ट्रम्प यांननिवडणूक प्रक्रियेत त्रुटी असल्याचे सांगायला सुरवाती केली होती. ऑरलँडोमधील सभेत देखील ट्रम्प यांनी त्याचाच उल्लेख केला.

हे ही पाहा:

अमेरिकेतील सिनेट निवडणूक महत्वाची का?

सभेसाठी जमलेल्या जनतेला उद्देशून ट्रम्प म्हणाले की, “तुमच्या पाठिंब्याने आपण (२०२२ मध्ये) हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्ह आणि सिनेटमध्ये पुन्हा बहुमत मिळवू आणि २०२४ च्या निवडणुकीत पुन्हा एकदा रिपब्लिकन राष्ट्राध्यक्ष बसवू.” पुढे जाऊन ते असंही म्हणाले की, “आणि कोणास ठाऊक? कदाचित मीच पुनः डेमोक्रॅट्सना पराभूत करीन.”

Exit mobile version