‘त्या’ घटनेनंतर विल स्मिथने हॉलिवूडच्या अकादमीचा दिला राजीनामा

‘त्या’ घटनेनंतर विल स्मिथने हॉलिवूडच्या अकादमीचा दिला राजीनामा

जगभरात मानाचा समाजाला जाणारा ऑस्कर पुरस्कार सोहळा यंदा वेगळ्याच घटनेमुळे चर्चेत आला. अभिनेता विल स्मिथ याने सोहळ्याचा निवेदक ख्रिस रॉक याला भर कार्यक्रमात मंचावर जाऊन कानशिलात लगावली. या घटनेवरून जगभरात प्रतिक्रिया उमटल्या. या घटनेनंतर विलने ख्रिसची माफी मागितली होती. दरम्यान, आता अभिनेता विल स्मिथने हॉलिवूडच्या अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसचा राजीनामा दिला आहे.

ख्रिस रॉक याने सूत्रसंचालन करत असताना विल स्मिथ याने जेव्हा विलच्या पत्नीवर विनोद केला, तेव्हा संतप्त विलने मंचावर जाऊन त्याच्या कानशिलात लगावली. त्यानंतर त्याने त्याने ख्रिसला मारल्याबद्दल माफी मागत दिलगिरी व्यक्त केली होती. मात्र, त्यानंतर ख्रिस रॉकला त्याने मारलेली ही थापड ही ‘धक्कादायक, वेदनादायक आणि अक्षम्य चूक’ असल्याचे म्हटले आहे.

एका निवेदनात विलने म्हटले आहे की, “मी अकादमीच्या विश्वासाचा विश्वासघात केला आहे. मी इतर नामांकित आणि विजेत्यांना त्यांच्या असामान्य कार्यासाठी आनंद साजरा करण्याची संधी हिरावून घेतली आहे. मी अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे आणि बोर्डाकडून जी कारवाई केली जाईल, त्याचे परिणाम मी स्वीकारेन,” असे विल स्मिथने म्हटले आहे.

हे ही वाचा:

श्रीलंकेशी बात आणि चीनला लाथ

भारतात मार्चमध्ये उष्णतेचा विक्रमी पारा

मोदी म्हणाले आगामी वर्षात सर्व मनोकामना पूर्ण होवोत

भारत-ऑस्ट्रेलियामध्ये झाला ‘ऐतिहासिक’ करार

ऑस्कर सोहळ्यात घडलेल्या या घटनेनंतर जगभरातून प्रतिक्रिया उमटल्या होत्या. दरम्यान, आता या घटनेला आणि सोहळ्याला आठवडा होत आला असताना विलने हॉलिवूडच्या ऍकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसचा राजीनामा दिला आहे.

Exit mobile version