बायडेन यांच्या पाठोपाठ ऋषी सुनकही करणार इस्रायल दौरा?

ब्रिटनचा इस्रायलला पाठींबा

बायडेन यांच्या पाठोपाठ ऋषी सुनकही करणार इस्रायल दौरा?

इस्त्राइल आणि हमास यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस अधिक भीषण होत असून अनेक निष्पाप नागरिकांचा यात मृत्यू झाला आहे. या युद्धात अमेरिका हा इस्त्राइलच्या पाठिशी खंबीरपणे उभा असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी इस्त्राइलच्या बाजूने उघड भूमिका घेतली आहे. तसेच ते लवकरच इस्राइला भेट देणार असल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान आता अमेरिकेपाठोपाठ ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक देखील इस्रायलला भेट देण्याची तयारी करत असल्याची माहिती समोर आली आहे.

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे लवकरच इस्रायलला भेट देण्याच्या चर्चा समोर आल्या आहेत. ‘स्काय न्यूज’ने यासंदर्भात वृत्त दिले असून ऋषी सुनक यांच्या कार्यालयामधून अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. ऋषी सुनक हे या आठवड्यात तेल अवीवला जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे देखील इस्रायलला रवाना झाले आहेत. ते पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची भेट घेणार आहेत.

ब्रिटनच्या मीडिया रिपोर्टनुसार, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक या आठवड्यात इस्रायलला जाऊ शकतात. गेल्या आठवड्यात, परराष्ट्र मंत्री जेम्स चतुराईने देखील इस्रायली लोकांशी एकता दर्शवण्यासाठी भेट दिली होती. ९ ऑक्टोबरलाच व्हाईट हाऊसने एक संयुक्त पत्र जारी केले होते. ज्यामध्ये फ्रान्स, जर्मनी, इटली, ब्रिटन, अमेरिका आणि जर्मनी यांनी इस्रायलला पाठिंबा देण्याबाबत चर्चा केली होती.

हे ही वाचा:

फरार ड्रग्ज तस्कर ललित पाटीलच्या चेन्नईमधून आवळल्या मुसक्या

जरांगे पाटलांना समज कोण देणार?

श्वानांच्या मदतीने इस्रायलमधील पीडितांना देणार दिलासा

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन बुधवारी इस्रायलच्या दौऱ्यावर

दरम्यान, गाझा येथील रुग्णालयात झालेल्या स्फोटात किमान ५०० लोक ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. तर, अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेवर जो बायडन यांनी नाराजी आणि दु:ख व्यक्त केलं आहे. तर, जॉर्डनने शिखर परिषद रद्द केली असून या परिषदेत बायडन अरब देशांच्या नेत्यांना भेटणार होते.

Exit mobile version