कॅनडा आणि भारत यांच्यामधील राजनैतिक वाद चिघळले असले तरी खुद्द कॅनडामध्येच पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांना देशवासीयांचा रोष पत्करावा लागत आहे. देशाचे विरोधी पक्षनेते, कन्झर्वेटिव्ह पक्षाच्या प्रमुखांनी पंतप्रधानांवर टीका करताना सत्तेत येऊन आठ वर्षे होऊनही ट्रुडो हे भारताबरोबर चांगले संबंध प्रस्थापित करू शकले नाहीत. दोन्ही देशांत तणावपूर्ण संबंध आहेत,’ असे टीकास्त्र सोडले. तसेच, ते भविष्यात कॅनडाचे अध्यक्ष झाल्यास भारत आणि कॅनडादरम्यान चांगले संबंध प्रस्थापित करतील, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
कन्झर्वेटिव्ह पक्षाचे प्रमुख आणि कॅनडाच्या संसदेतील विरोधी पक्षनेते खासदार पियरे पोइलविरे हे मंगळवारी एका रेडिओ शोमध्ये सहभागी झाले होते. त्यांनी या कार्यक्रमात कॅनडाला भारताशी औपचारिक संबंध ठेवणे गरजेचे असल्याचे अधोरेखित केले. भारत ही जगभरातील सर्वांत मोठी लोकशाही आहे, असे ते म्हणाले.
तसेच, भारतातून ४१ राजनैतिक अधिकाऱ्यांना मायदेशी पाठवण्याच्या दोषही त्यांनी ट्रुडो यांना दिला. ते राजनैतिक अधिकारीच सक्षम नव्हते तसेच, बेजबाबदार होते. कॅनडा केवळ भारताबरोबरच नव्हे तर अन्य देशांसंदर्भातही विवादात सापडले आहेत, असे त्यांनी सांगितले. आपण एकमेकांशी काही मुद्द्यांबाबत असहमत असू शकतो, मात्र दोन देशांमध्ये चांगले नातेसंबंध असणे महत्त्वाचे आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.
हे ही वाचा:
‘जेलर’मधला अभिनेता विनायकन याला अटक
ठाकरे हमास, लष्कर ए तैय्यबाशीही युती करतील!
इस्रायलची अटीतटीची लढाई; आता ‘आकाश-पाताळ’ एक करणार
दसऱ्यानिमित्त भारत- चीन सीमेवर शस्त्रपूजन
कॅनडामध्ये हिंदू मंदिरांच्या होणाऱ्या तोडफोडीबाबतही त्यांनी भाष्य केले. ज्या व्यक्ती हिंदू मंदिरांचे नुकसान करतात, लोकांचे नुकसान करतात किंवा त्यांच्या संपत्तीचे नुकसान करतात, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजेत, असे त्यांनी सांगितले.