आयटी क्षेत्रातील दिग्गज इन्फोसिस कंपनी रशियातील आपली सर्व कार्यालये बंद करणार असल्याची माहिती समोर येत आहे. ब्रिटीश मीडियाने इन्फोसिस कंपनीचे सह-संस्थापक एनआर नारायण मूर्ती, यांचे जावई ऋषी सुनक यांच्यावर व्लादिमीर पुतिन यांच्या राजवटीत नफेखोरी केल्याचा आरोप केला आहे. ऋषी हे यूकेचे चॅन्सेलर ऑफ द एक्स्चेकर आहेत. इन्फोसिसने मॉस्कोमधील आपल्या कर्मचा-यांना इतरत्र काम शोधण्यास सांगितले आहे.
यापूर्वी इन्फोसिसने रशियामधील स्थानिक उद्योगांशी कोणतेही सक्रिय व्यावसायिक संबंध ठेवण्यासाठी नकार दिला होता. त्यांनतर युक्रेनच्या युद्धातील पीडितांना मदत म्हणून इन्फोसिस १ मिलियन डॉलर्स देण्याचे कबूल केले होते. ऋषी सुनक हे नारायण मूर्ती यांची मुलगी अक्षता मूर्ती यांचे पती आहेत. अक्षता मूर्ती यांचे इन्फोसिसमध्ये चारशे मिलीयन पौंडांपेक्षा जास्त शेअर्स आहेत. मात्र, ऋषी सुनक यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे. अक्षता मूर्ती यांच्याकडे इन्फोसिसचे ०.९ % पेक्षा जास्त हिस्सा असल्याचा अंदाज आहे. ऋषी सुनक यांच्या प्रवक्त्याने यापूर्वी म्हटले आहे की, ऋषी सुनक किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याचा इन्फोसिस कंपनीच्या कामकाजाच्या निर्णयांमध्ये सहभाग नाही.
हे ही वाचा:
वसईत एका वकिलाच्या घरावर धर्मांध मुस्लिमांकडून दगडफेक, गाडीची तोडफोड
मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ मार्गिकांचे लोकार्पण
….म्हणून दिल्लतील यूएस दूतावासाबाहेर लोकांनी पोस्टर चिकटवले
अखिलेशचे काका शिवपाल भाजपाच्या वाटेवर?
इन्फोसिस कंपनी ही भारतातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. सुमारे ५० देशांमध्ये इन्फोसिस कंपनीच्या शाखा आहेत. इन्फोसिसने २०१६ मध्ये मॉस्कोमध्ये एक अभियांत्रिकी केंद्र स्थापन केले. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर अनेक आयटी कंपन्यांनी देशातील त्यांचे कामकाज स्थगित केले आहे.