“हे युद्धाचे युग नाही” असे रशिया युक्रेन युद्धावर पुतीन यांच्याशी केलेल्या संभाषणात भाष्य केलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शांततेच्या नोबेल पुरस्काराचे दावेदार असू शकतात असे नोबेल पुरस्कार समितीचे सदस्य एस्ले टोजे यांनी म्हंटले आहे. रशिया युक्रेन युद्ध तब्बल एक वर्ष सुरु आहे. या युद्धाचे पडसाद संपूर्ण जगभरात बघायला मिळत आहेत. त्यात भारत हे युद्ध थांबवण्यासाठी सतत प्रयत्न करत असल्याचे सगळ्या जगाने बघितले आहे. युरोपमधल्या या युद्धाला थांबवण्याच्या भारताच्या प्रयात्नांचे आता नोबेल पारितोषिक समितीने तोंड भरून कौतुक केले आहे. नोबेल समितीचे एक सदस्य एस्ले टोजे यांनी भारताचे तोंड भरून कौतुक केलेले दिसत असून पंतप्रधानांच्या पाठीवर त्यांनी कौतुकाची पाठ थोपटली आहे.
पंतप्रधान मोदींचे कौतुक करताना नोबेल समितीचे सदस्य टोजे म्हणाले कि, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नोबेल शांतता पुरस्काराचे प्रबळ दावेदार असू शकतात. ते अत्यंत विश्वासू नेते आहेत. ते शांतता प्रस्थापित करू शकतात याशिवाय जगातल्या मोठ्या राजकारण्यांपैकी ते एक आहेत. आणि सध्या ते शांततेसाठी मोठे योगदान देत आहेत. पुढे ते असे सुद्धा म्हणाले कि, मला आनंद आहे कि मोदी केवळ भारत देशाचेच नाही काम करत तर जगातील शांततेच्या महत्वाच्या मुद्द्यांवरसुद्धा काम करतात. जगाने भारताकडून शिकण्याची खरंच खूप गरज आहे. आता भारत देश महासत्ता होणार हे नक्की आहे.
हे ही वाचा:
उद्धव ठाकरेंच्या मशालीतला आणखी एक निखारा निघाला…दीपक सावंत एकनाथ शिंदेंकडे
‘राम- सीता’ ३५ वर्षानंतर पुन्हा आले एकत्र…
राहुल गांधी आज येणार संसदेत, लंडनमधील भाषणाबद्दल बोलणार का?
तुषार मेहतांनी नेमके काय सुचवले?
का देतात नोबेल पुरस्कार?
स्वीडिश शास्त्रज्ञ अल्फ्रेड बर्नार्ड नोबेल यांच्या स्मरणार्थ नोबेल फाऊंडेशन तर्फे नोबेल पुरस्कार दिला जातो. या नोबेल फाऊंडेशनची स्थापना २९ जून १९०० साली झाली आणि १९०१ पासून हे पुरस्कार देण्यात येतात. रॉयल स्वीडिश अकादमी ऑफ सायन्सेस भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, अर्थशास्त्र, या क्षेत्रांसाठी नोबेल पुरस्कार आणि नॉरविजन नोबेल समिती शांताता क्षेत्रांत हा पुरस्कार प्रदान करते. भौतिकशास्त्र , रसायनशास्त्र, शांतता , साहित्य, वैद्यकीय विज्ञान , आणि अर्थशास्त्र या क्षेत्रांमध्ये दिला जाणारा हा सर्वोच्च पुरस्कार असून भारताशी संबंधित दहा जणांना आत्तापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या श्रेणीमध्ये हे नोबेल पुरस्कार मिळालेले आहेत.