राफेल पाठोपाठ ‘एफ-१५इएक्स’ ही हवाई दलात सामिल?

राफेल पाठोपाठ ‘एफ-१५इएक्स’ ही हवाई दलात सामिल?

अमेरिका विमान उत्पादक बोईंगला अमेरिकन सरकारकडून नवे एफ-१५इएक्स लढाऊ विमान भारताला देण्याची परवानगी दिली आहे.

अमेरिकन हवाई दलाने याच विमानांची मागणी बोईंगकडे केली आहे. बोईंगच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे विमान २०५५ पर्यंत कार्यरत राहणे अपेक्षित आहे आणि या विमानात भविष्यातील गरजांनुसार बदल करण्याची क्षमता आहे. बोईंगने एफ-१५इएक्स विमानाची माहिती दिली आहे. हे विमान अत्याधुनिक असून, लढाई दरम्यान अतिशय उपयुक्त ठरणार आहे. विविध भूमिका बजावणारे विमान सर्वप्रकारच्या वातावरण्यास उड्डाण करण्यास समर्थ आहे. एफ-१५ विमानांच्या वर्गातील हे अत्याधुनिक विमान आहे.

एफ-१५इएक्स हे भविष्यातील अनेक भूमिका बजावू शकणारे विमान भारतीय हवाई दलासाठी उपयुक्त ठरणार आहे. या विमानाची वाहनक्षमता अजोड आहे. उत्कृष्ट कामगिरीसाठी या विमानात, अतिशय अद्ययावत अशी प्रणाली वापरण्यात आली आहे. उच्च दर्जाचे तंत्रज्ञान, शस्त्र आणि विविध सेन्सर्स यांनी हे विमान युक्त असल्याची माहिती कंपनीने दिली.

या बरोबरच बोईंग इंडिया रिपेअर डेव्हलपमेंट ऍंड सस्टेनमेंट (बीआयआरडीएस) भारतातही स्थापन करण्याची घोषणा बोईंगने केली आहे. प्रवासी आणि लढाऊ विमानांच्या अभियांत्रीकी, दुरूस्ती, देखभाल याबाबतच्या सर्व व्यवस्थांची रचना बीआयआरडीएस मार्फत करण्यात येईल.

Exit mobile version