एलॉन मस्क ट्विटरच्या प्रमुख पदावरून पायउतार होणार?

एलॉन मस्क यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एलॉन मस्क ट्विटरच्या प्रमुख पदावरून पायउतार होणार?

नवनिर्वाचित ट्विटर प्रमूख आणि टेस्लाचे संचालक एलॉन मस्क यांनी ट्विटरवर एक पोल टाकून वापरकर्त्यांमध्ये खळबळ उडवून दिली होती. एलॉन मस्क यांनी ट्विटरचे प्रमुख राहावे की नाही, अशा प्रकारचं ट्विट त्यांनी टाकलं होतं. दरम्यान, या पोलवरून एलॉन मस्क यांच्या विरोधातील उत्तराला जास्त वापरकर्त्यांनी पसंती दिली आहे. त्यामुळे आता एलॉन मस्क ट्विटरच्या प्रमुख पदावरून पायउतार होणार की नाही? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

एलॉन मस्क यांनी ट्विटरवर हो नाही च्या स्वरूपात एक पोल टाकला होता. ज्यामध्ये ट्विटरच्या प्रमुख पदावरून मी पायउतार व्हावे असे वाटते का? असा सवाल करण्यात आला होता. यामध्ये हो या उत्तरला ५७ टक्के लोकांनी पसंती दिली आहे. तर नाही या उत्तरला ४३ टक्के लोकांनी पसंती दिली आहे. विशेष म्हणजे एलॉन मस्क यांनी वापरकर्त्यांचा जो कौल असेल तो मान्य केला जाईल, असंही म्हटले आहे. त्यामुळे सध्या आलेल्या वापरकर्त्यांच्या पसंतीनुसार एलॉन मस्क पायउतार होणार की नाही? हे पाहावे लागणार आहे.

हे ही वाचा:

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, आठ जणांना अटक

कर्नाटक विधानसभेत स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा, काँग्रेसला मळमळ

आजपासून हिवाळी अधिवेशन सुरु

मेस्सीचे वर्ल्डकपमध्ये अनेक विक्रम; एकाच स्पर्धेत सर्व फेऱ्यांत गोल नोंदविणारा एकमेव खेळाडू

ट्विटरची सूत्रे हातात घेतल्यावर मस्क यांनी कंपनीत अनेक बदल जाहीर केले. यातील प्रमूख मोठा बदल म्हणजे ट्विटरवरील चालू नसलेले १५० कोटी ट्विटर खाती काढून टाकणार असे त्यांनी सांगितले. यामुळे नवीन वापरकर्त्यांना ट्विटर वापरण्याची संधी मिळेल आणि त्यासोबतचं नवीन वापरकर्ते तयार होतील. याशिवाय कर्मचाऱ्यांचा नोकरकपातीचाही मोठा निर्णय त्यांनी घेतला होता.

Exit mobile version