एलन मस्क ट्विटर खरेदी करणार?

एलन मस्क ट्विटर खरेदी करणार?

टेस्लाचे सीईओ आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी असलेले एक एलन मस्क यांनी ट्विटरला एक ऑफर दिली आहे. एलन मस्क हे ट्विटर खरेदी करण्यासाठी उत्सुक असल्याची माहिती आहे. मस्क यांनी ५४.२० डॉलर प्रति शेअर या दराने कंपनीचे शेअर रोख रक्कमेत खरेदी करण्याची तयारी दर्शवली आहे. मस्क यांच्या या ऑफरच्या वृत्तानंतर ट्वीटरचे शेअर दर वधारले आहेत.

काही दिवसांपूर्वी एलन मस्क यांना ट्वीटर कंपनीच्या संचालक मंडळात स्थान देण्याचा निर्णय झाला होता. याची घोषणा ट्वीटरचे सीईओ पराग अग्रवाल यांनी केली होती. मात्र, एलन मस्क यांनी ट्विटरच्या संचालक मंडळात सामील होण्यास नकार दिला होता. त्यानंतर आता एलन मस्क यांनी ट्विटर ४१ बिलियन डॉलरमध्ये विकत घेण्याची ऑफर दिल्याचे वृत्त समोर आले आहे.

“ट्वीटर कंपनीसाठी माझ्याकडून ही शेवटची आणि चांगली ऑफर आहे. कंपनीने या ऑफरवर गांभीर्याने विचार न केल्यास मी ट्वीटरमधील माझ्या गुंतवणुकीबाबत फेरविचार करेल,” असा इशाराही एलन मस्क यांनी दिल्याचे वृत्त ‘रॉयटर्स’ने दिले आहे.

हे ही वाचा:

फडणवीसांनी १४ ट्विटस करत केली शरद पवारांची पोलखोल

एनसीबी मुंबई विभागाच्या संचालक पदी अमित घावटे

पहिलं तिकीट खरेदी करून पंतप्रधान मोदींनी केले प्रधानमंत्री संग्रहालयाचे उद्घाटन

दिवाळखोरी आणि परकीय चलन

एलन मस्क यांनी ४ एप्रिल रोजी ट्विटरमध्ये ९.२ टक्के हिस्सा विकत घेतला. यूएस एसईसी (Securities and Exchange Commission) फाइलिंगमध्ये ही माहिती देण्यात आली होती.

Exit mobile version