पाकिस्तानी तरुणांना नकोसा झालाय त्यांचा देश!

सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती आली समोर

पाकिस्तानी तरुणांना नकोसा झालाय त्यांचा देश!

पाकिस्तानातील अर्ध्याहून अधिक तरुणांना देश सोडून जायचे आहे. अपुऱ्या संधी आणि महागाईचा आगडोंब यामुळेच या तरुणांना हा देश सोडून जायचे आहे, असे पाकिस्तान मधल्या पीआईडीई या संस्थेने केलेल्या एका सर्वेक्षणातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

पाकिस्तान सध्या आर्थिक अडचणींमध्ये असल्यामुळे तिथे महागाई प्रचंड वाढली आहे. हातात काम नाही, बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड आहे. शिवाय धार्मिक तंटे सुद्धा सुरूच आहे. म्हणूनच या पाकिस्तानी तरुणांना आपल्या देशाचा तिटकारा आला आहे. या सर्वेक्षणानंतर ६७ टक्के तरुणांना हा देश सोडून जायचे आहे. मागील सर्वेक्षणात हा आकडा ६२ टक्के इतका होता. पीआयडीईने हे सर्वेक्षण केले असून या संस्थेचे ज्येष्ठ अर्थ तज्ज्ञ डॉ. फहीम जहांगीर खान यांनी आपली या सर्वेक्षणाबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

पाकिस्तानांत ३१ टक्के लोक शिकलेले तरुण बेरोजगार आहेत. तर चांगल्या संधीसाठी ६७ टक्के तरुणांना देश सोडून जावेसे वाटत असल्याचे खान यांनी सांगितले आहे. पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेच्या परिस्थितीवर ‘इकोनफेस्ट’ या दोन दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते त्यांत फहीम खान यांनी आपले मत व्यक्त केले आहे.  पाकिस्तान मध्ये २०० पेक्षा जास्त विद्यापीठे आहेत. या विद्यापीठातून दरवर्षी हजारो विद्यार्थी पदव्या प्राप्त करून बाहेर पडतात. पण त्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध नाहीत. कारण कोणतीही डिग्री म्हणजे रोजगाराची हमी नाही. कारण या तरुणांकडे कुशलतेचा अभाव आहे. आणि कंपन्या कुशलतेची चौकशी करत आहेत.

हेही वाचा :

सौदी अरेबियात नमाजसाठी लाऊडस्पीकर बंद, या अटी पाळा!

ऑस्कर विजेती ४० मिनिटांची डॉक्युमेंट्री द एलिफन्ट…बनली ४५० तासांच्या फूटेजमधून

नाटू-नाटू, द एलिफन्ट व्हिस्परर्सने रचला इतिहास, भारताला मिळाले दोन ऑस्कर

दिलासा.. कांद्याला प्रति क्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान

त्यामुळे त्यांच्या शिक्षकांसह सरकारने सुद्धा या समस्येचा गांभीर्याने विचार करावा आणि या सरकारने मार्ग काढण्यासाठी लक्ष देणे आवश्यक आहे असेहि पुढे खान म्हणाले आहेत.  पाकिस्तानमध्ये १५ ते २४ वयोगटातील तरुणांनी देश त्वरित सोडून जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तरुणांना योग्य त्या संधी उपलब्ध नसल्यामुळे आर्थिक चणचण निर्माण झाली आहे. असे या सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे. पाकिस्तानात सध्या चांगले कौशल्य असलेले तरुण उपलब्ध नाहीत तर , दुसरीकडे योग्य तरुणांना चांगल्या संधीच नसल्याचे सांगण्यात येत आहे. शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण मिळत नाही जुनाच अभ्यासक्रम शिकवलं जात असून विद्यार्थ्यांची म्हणूनच प्रगती होत नाही आहे. असे जेष्ठ अर्थतज्ज्ञ दुर्रे नायब यांनी म्हंटले आहे.

Exit mobile version