29 C
Mumbai
Tuesday, November 19, 2024
घरदेश दुनियाअफगाणिस्तानमधील भारतीयांना तालिबानने का सुरक्षा पुरवली? वाचा सविस्तर...

अफगाणिस्तानमधील भारतीयांना तालिबानने का सुरक्षा पुरवली? वाचा सविस्तर…

Google News Follow

Related

मोदी सरकारने पुन्हा एकदा भारतीयांना सुरक्षितपणे आणण्याचा चमत्कार केला आहे. अफगाणिस्तानमधून भारत सरकारने १५० पेक्षा जास्त भारतीयांना सुखरूप बाहेर काढले आहे. त्याहीपेक्षा महत्वाची गोष्टी म्हणजे ज्या पद्धतीने भारतीयांना सुखरूप घरी आणले आहे ते कोणत्याही चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही.

भारतीय नागरिकांना काबुल विमानतळावर सोडण्यासाठी हातात मशीन गन आणि रॉकेट लॉन्चर घेऊन तालिबानने सुरक्षा पुरवली. काल रात्री १२ वाजता १५० भारतीय नागरिकांना काबुल मधून भारतात आणण्यात आले. यावेळी तालिबानने विमानतळाजवळ गाडयांमधून उतरून गर्दीला पांगवण्यासाठी गर्दीवर बंदुका रोखल्या आणि भारतीय नागरिकांना काबुल विमानतळात जाण्याचा मार्ग मोकळा केला.

अफगाणिस्तानात आता तालिबानने राज्य हस्तगत केले आहे. अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घनी यांनी देशाबाहेर पलायन केले. त्यामुळे तिथे अराजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा वेळेस विविध देशांनी आपल्या नागरीकांना तेथून सोडवण्यास सुरूवात केली आहे. यामध्ये भारताचा देखील समावेश आहे.

अफगाणिस्तानमध्ये तालिबानने कब्जा केल्यानंतर तालिबानच्या अनेक अनन्वित छळांचे व्हिडिओ समोर आले आहेत. यामध्ये हिंदू, शीख यांच्यासारखे अल्पसंख्यांक तसेच महिला आणि मुलांना सर्वाधिक जाच सहन करावा लागत आहे. यामुळे अफगाण महिला आपल्या मुलांना वाचवण्यासाठी काय टोकाची पावलं उचलावी लागत आहेत, हे पाहून कोणत्याही सहृदय व्यक्तीला नक्कीच वेदना होतील.

हे ही वाचा:

मास्क असेल तरच पुष्पगुच्छ घेणार

तालिबानपासून मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी काय करत आहेत महिला?

बूस्टर डोसबद्दल डब्ल्यूएचओने केले ‘हे’ महत्वाचे वक्तव्य

अफगाणिस्तानमध्ये लोकशाही नाही तर, केवळ शरिया

स्काय न्यूजमधील एका अहवालात विमानतळावर उभ्या असलेल्या गार्डच्या अनुभवांचे वर्णन केले आहे. ब्रिटीश लष्कराचा एक वरिष्ठ अधिकारी अगदी म्हणतो की त्यांची लष्करी टीम महिलांची ही पावले पाहून खूप दुःखी आहे. “हे धोकादायक आहे. महिला स्वतःच्या मुलांना घेऊन काटेरी तारा ओलांडत होत्या आणि सैनिकांना पकडण्यास सांगत होत्या. काही मुले तारांमध्ये अडकत होती,” अधिकारी म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
192,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा