युनूस यांच्या सत्तेची लालसा बांगलादेशला जाळतेय!

बांगलादेशच्या माजी राष्ट्राध्यक्ष शेख हसिना यांचा प्रहार

युनूस यांच्या सत्तेची लालसा बांगलादेशला जाळतेय!

बांगलादेशच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांनी त्या लवकरच देशात परतणार असल्याचे संकेत दिले आहेत. माजी पंतप्रधान शेख हसीना म्हणाल्या की, अल्लाहने मला एका कारणासाठी जिवंत ठेवले आहे आणि लवकरच तो दिवस येईल जेव्हा न्याय मिळेल. भारतात आश्रयाला असलेल्या अवामी लीग अध्यक्षा, सोशल मीडिया संवादादरम्यान त्यांच्या पक्षाच्या नेत्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधत असताना त्यांनी हे विधान केले.

बांगलादेशातील अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस यांच्यावर शेख हसीना यांनी टीकेची झोड उठवली. मुहम्मद युनूस यांचे वर्णन त्यांनी लोकांवर कधीही प्रेम न करणारा असे केले. पुढे त्या म्हणाल्या की, त्यांनी उच्च व्याजदराने कर्ज दिली आणि परदेशात ऐषोआरामात राहण्यासाठी ते पैसे वापरले. तेव्हा आम्हाला त्यांचा दुटप्पीपणा समजला नाही, म्हणून आम्ही त्यांना खूप मदत केली. पण लोकांना त्याचा काही फायदा झाला नाही. त्याने स्वतःसाठी चांगले केले. नंतर सत्तेची लालसा निर्माण झाली जी आता बांगलादेशला जाळत आहे.

पुढे त्या म्हणाल्या की, विकासाचे मॉडेल म्हणून पाहिला जाणारा बांगलादेश आता दहशतवादी देश बनला आहे. आमचे नेते आणि कार्यकर्ते अशा प्रकारे मारले जात आहेत की ज्याचे वर्णन करता येत नाही. अवामी लीग, पोलीस, वकील, पत्रकार, कलाकार, सर्वांना लक्ष्य केले जात आहे. मी माझे वडील, आई, भाऊ, सर्वांना एकाच दिवसात गमावले. तुमचे स्वतःचे लोक गमावण्याचे दुःख मला माहित आहे. अल्लाह माझे रक्षण करत राहतो, कदाचित तो माझ्याद्वारे काही चांगले करू इच्छित असेल. ज्यांनी हे गुन्हे केले आहेत त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. ही माझी प्रतिज्ञा आहे, असे शेख हसीना म्हणाल्या.

हे ही वाचा : 

हुर्रियत कॉन्फरन्सशी संबंधित तीन गटांनी सोडला फुटीरतावादाचा मार्ग

रुग्णांकडून कोणतेही डिपॉझिट घेऊ नका, आधी उपचार करा मग पैसे मागा !

जाणून घ्या चक्रफूलाचे फायदे

संयुक्त अरब अमिरातच्या उपपंतप्रधानांच्या भारत दौऱ्यातून काय साध्य होणार ?

दरम्यान, बांगलादेश सरकार शेख हसीना यांचे प्रत्यार्पण करण्याचा प्रयत्न करत आहे. पंतप्रधान मोदी आणि मोहम्मद युनूस यांची थायलंडमध्ये बिमस्टेक परिषदेच्या वेळी भेट झाली होती, तेव्हाही मोहम्मद युनूस यांनी शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाची मागणी केली होती. बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूंवरील हल्ल्यांच्या घटनांबद्दल पंतप्रधान मोदींनी मोहम्मद युनूस यांच्याकडे चिंता व्यक्त केली होती.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणाचा चुथडा कुणी केला? | Mahesh Vichare | Deenanath Mangeshkar Hospital

Exit mobile version