परदेशांत कोरोनाचा पुन्हा एकदा वाढता कहर बघता आपले सरकार सतर्क झाले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना पत्र लिहिले आहे.
चीनसह परदेशांत कोरोनाची अनेक प्रकरणे वाढत आहेत.यांमुळे भारत सरकार या दृष्टीने खबरदारीची पावले उचलत आहे. म्हणूनच राजस्थान चे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांना पत्र लिहून भारत जोडो यात्रा पुढे ढकलण्याचे आवाहन केले आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना लिहिलेल्या पत्रात म्हंटले आहे की, भारत जोडो यात्रेमध्ये कोरोना नियमांचे काटेकोर पालन करण्यात यावे. भारत जोडो यात्रेतील सहभागी सर्वानी मास्क घालणे आवश्यक असून सॅनीटायझर वापरणे आवश्यक आहे. ज्यांचे लसीकरण झाले आहे त्यांनाच यात्रेची परवानगी आहे. यात्रेत सहभागी होण्याआधी आणि यात्रेनंतर लोकांना वेगळे राहणे आवश्यक असल्याचे पुढे त्यांनी म्हंटले आहे.
हे ही वाचा:
सर्कसचा तंबू गुंडाळण्याच्या मार्गावर
कोरोनामुळे अचानक येतो का हृदयविकाराचा झटका?
९७ कोटी रुपये भरा, राज्यपालांचे ‘आप’ला आदेश
साईबाबांच्या दर्शनासाठी १०९ कोटीचे ‘कॉम्प्लेक्स’
कोविड नियम लक्षात घेऊन ते पाळणे शक्य न झाल्यास सार्वजनिक आरोग्य आणीबाणीची परिस्थिती लक्षात घेऊन या साथीच्या आजारापासून देशाला वाचवण्यासाठी हा प्रवास पुढे ढकलण्यात यावा. सध्या भारत जोडो हि यात्रा हरियाणा मध्ये असून ती नंतर पंजाब मध्ये जाईल.