४० तास ढिगाऱ्याखाली तरी अख्खे कुटुंब जिवंत

बचावपथकाने वाचविल्यानंतर सगळ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू

४० तास ढिगाऱ्याखाली तरी अख्खे कुटुंब जिवंत

सगळीकडे मातीचा ढिगारा..कोण कुठे..कशा प्रकारे अडकले आहे कळत नाहीये..बचाव पथकाला ढिगाऱ्याखाली  फक्त मृतदेह हाती लागत आहेत. म्हणतात ना काळ आला होता पण, वेळ आली नव्हती. तुर्कीत महाप्रलंयकारी भूकंप झाला आहे पण त्यात एकेठिकाणी ४० तास ढिगाऱ्याखाली अडकलेलं संपूर्ण कुटुंब आश्चर्यकारकरित्या जिवंत होतं. बचाव पथकाने त्यांच्या दोन चिल्यापिल्यानाही वाचवण्यात यश आलं आहे. त्यानंतर प्रत्येकाच्याच आनंदाला पारावर उरला नाही. प्रत्येकाच्या डोळ्यात आनंदाचे आश्रू तरळताना दिसत होते.

तुर्की आणि सिरियातील भूकंप होऊन दोन दिवस उलटले आहेत. आता कोणी जिवंत सापडेल की नाही हाच विचार प्रत्येकाच्या मनात आहे. तरी पण बचाव पथके प्रयत्नांची शर्थ करून जिवंत व्यक्तींचा शोध घेत आहेत.

हे ही वाचा:

काँग्रेसवाल्यांनो, इल़ॉन मस्कने केला तर चमत्कार अदाणींनी केला तर बलात्कार?

पोलिसांना वाटले धमकीचा कॉल, पण लक्षात आले तेव्हा डोक्यावर हात मारून घेतला

पंतप्रधान मोदींनी लोकसभेत काँग्रेसला पात्रता दाखविली!

तुर्कीचा गोलरक्षक तुर्कस्लान भूकंपात मृत्युमुखी

उत्तर सीरियामध्ये ४० तासांपासून ढिगाऱ्याखाली दबलेल्या संपूर्ण कुटुंबाला बचाव पथकांनी वाचवले आहे.  या कुटुंबातील दोन मुले तकबीर आणि जॉय यांना जिवंत बाहेर काढण्यात यश आले. यानंतर लोकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. तब्बल ४० तासांनंतर चिमुरडीला ढिगाऱ्यातून बाहेर काढल्यानंतर लोकांनी तिला आपल्या खांद्यावर  घेऊन आनंदाने  घोषणा देण्यास सुरुवात केली.

तुर्की आणि सीरियामध्ये गेल्या ४८ तासांत सुमारे ५ वेळा भूकंपाचे तीव्र धक्के बसले आहेत. यामध्ये ९,००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. अजूनही हजारो लोक बेपत्ता आहे. जे ढिगाऱ्याखाली दबले गेले असावेत. २० हजारांपेक्षा जास्त  लोक जखमी झाले आहेत. यापैकी हजारो लोकांची प्रकृती गंभीर आहे. गेल्या दोन दिवसांपासून मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. भारताने आपली चार विमाने मदत सामग्री आणि बचाव पथके तुर्कस्तान आणि सीरियाला पाठवली आहेत.

Exit mobile version