अफगाणिस्तानमध्ये आता लवकरच तालिबानचे सरकार स्थापन होणार असून त्याची जोरदार तयारी सुरु आहे. मुल्ला मोहम्मद हसन अखुंद याची तालिबान सरकारच्या प्रमुखपदी निवड होणार असून तसा प्रस्ताव हिब्दतुल्लाह अखुंजादा याने दिला असल्याचं काबुलच्या माध्यमांनी सांगितलं आहे.
‘द न्यूज’ने दिलेल्या वृत्तानुसार, “हिब्दतुल्लाह अखुंजादाने स्वतः मुल्ला मोहम्मद हसन अखुंदाचं नाव रईस-ए-जम्हूर, रईस-उल-वजारा या अफगाणिस्तानच्या प्रमुख पदासाठी सुचवलं आहे. तालिबानच्या एका वरिष्ठ नेत्यानं ‘द न्यूज’ला सांगितलं, “मुल्ला बरादर अखुंद आणि मुल्ला अब्दुस सलाम त्यांचे सहाय्यक म्हणून काम करतील. अनेक तालिबानी नेत्यांसोबत चर्चा केल्यानंतर सर्वांनी मुल्ला मोहम्मद हसन अखुंदच्या नावावर सहमती दाखवली आहे.”
अफगाणिस्तानची राजधानी काबुलवर ताबा मिळवल्यानंतर २१ दिवसांनी आता तालिबान्यांनी पंजशीर प्रांतावरही ताबा मिळवल्याचा दावा केला आहे. आतापर्यंत पंजशीरमध्ये नॅशनल रेजिस्टेंस फ्रंटचा नेता अहमद मसूद याचा ताबा होता. पंजशीरवरुन तालिबान आणि नॅशनल रेजिस्टेंस फ्रंट यांच्यात संघर्ष सुरु होता. यामध्ये दोन्ही बाजूनं शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
हे ही वाचा:
काबूलमध्ये पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा
केंद्रीय मंत्र्याला अटक करतात पण माजी गृहमंत्री मात्र सापडत नाही
आता ‘या’ क्षेत्रातही होणार खाजगीकरण
५० कोटींचा दावा खुशाल टाकावा, मी घाबरत नाही
मुल्ला मोहम्मद हसन अखुंद सध्या तालिबानचे निर्णय घेणाऱ्या शक्तिशाली रहबारी शूरा परिषदेचा प्रमुख आहे. तो तालिबानचा उगम झालेल्या कंधारचा आहे. तो तालिबानच्या संस्थापकांपैकी एक आहे. त्याने २० वर्षे रहबारी शूराचा प्रमुख म्हणून काम केलंय. तालिबानच्या नेत्यांमध्ये स्वतःची खूप चांगली प्रतिष्ठा निर्माण केली. त्याला सैन्याची पार्श्वभूमी नसून तो एक धार्मिक नेता आहे. तो त्याच्या स्वच्छ चारित्र्य आणि भक्तीसाठी ओळखला जातो.