‘ओपनएआय’वर प्रश्न उपस्थित करणारे सुचीर बालाजी कोण होते?

अमेरिकेत आढळला मृतदेह

‘ओपनएआय’वर प्रश्न उपस्थित करणारे सुचीर बालाजी कोण होते?

आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनीच्या ऑपरेशन्स आणि पद्धतींबद्दल चिंता व्यक्त करणारे २६ वर्षीय माजी ओपनएआय संशोधक सुचीर बालाजी हे सॅन फ्रान्सिस्को येथील फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळून आल्याचे वृत्त समोर येताच खळबळ उडाली आहे. २६ नोव्हेंबर रोजी ते सॅन फ्रान्सिस्कोमधील त्यांच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळून आले होते. त्यांच्या मृत्यूची बातमी आता समोर आली आहे. प्राथमिक तपासात कुठलाही गैरप्रकार झाल्याचे पुरावे मिळालेले नसून, ही आत्महत्या असावी असा पोलिसांचा संशय आहे.

ओपनएआयसाठी चार वर्षे काम करणाऱ्या आणि चॅट जीपीटीच्या विकासात मोठी भूमिका बजावणाऱ्या भारतीय- अमेरिकन एआय संशोधक सुचीर बालाजी यांनी ओपन एआयवर अनेक गंभीर आरोप केले तेव्हा ते जगाच्या पटलावर प्रकाशझोतात आले. सुचीर यांनी दावा केला की, चॅटजीपीटी तयार करण्यासाठी पत्रकार, लेखक, प्रोग्रामर इत्यादींचे कॉपीराइट केलेले साहित्य वापरण्यात आले आहे आणि याचा थेट परिणाम अनेक व्यवसाय आणि व्यापारांवर होणार आहे. ओपनएआय विरुद्ध चालू असलेल्या कायदेशीर खटल्यांमध्ये सुचीर यांच्या ज्ञानाचा आणि साक्षीचा मोठा प्रभाव पडू शकला असता.

सुचीर बालाजी यांनी २०२१ मध्ये कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कले येथून कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी प्राप्त केली होती. बालाजी यांनी प्रोग्रामिंग स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली होती. ACM ICPC 2018 वर्ल्ड फायनलमध्ये ३१ वे स्थान पटकावले होते. तर, २०१७ पॅसिफिक नॉर्थवेस्ट प्रादेशिक आणि बर्कले प्रोग्रामिंग स्पर्धांमध्ये प्रथम स्थान पटकावले होते. याशिवाय त्यांनी Kaggle च्या TSA-प्रायोजित ‘पॅसेंजर स्क्रीनिंग अल्गोरिदम चॅलेंज’ मध्ये एक लाख डॉलर्सचे बक्षीस मिळवून सातवे स्थान देखील मिळवले होते. ओपनएआयमध्ये सामील होण्यापूर्वी त्यांनी स्केल एआय, हेलिया येथे काम केले आणि क्वोरा येथे सॉफ्टवेअर अभियंता म्हणूनही काम केले होते. यानंतर ChatGPT वर दीड वर्षांसह चार वर्षे OpenAI येथे काम केले. न्यूयॉर्क टाइम्समधील ऑक्टोबरच्या एका लेखात, त्यांनी ओपनएआयवर कॉपीराइट कायद्यांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला.

हे ही वाचा : 

‘स्टॅचू ऑफ युनिटी’चे शिल्पकार राम सुतार सिंधुदुर्गात उभारणार महाराजांचा पुतळा

‘ओपनएआय’वर प्रश्न उपस्थित करणाऱ्या सुचीर बालाजी यांचा अमेरिकेत आढळला मृतदेह

सीरियातून आलेल्या भारतीयांनी मानले मोदी सरकारचे आभार

हवाई दलाला मिळणार आणखी बळ; ताफ्यात दाखल होणार १२ सुखोई विमाने

OpenAI साठी चार वर्षे समर्पित केल्यानंतर बालाजी यांनी कंपनी सोडण्याचा निर्णय घेतला. ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत, त्यांनी तंत्रज्ञानाच्या संभाव्य सामाजिक हानीबद्दल वाढत्या चिंता प्रकट केल्या, विशेषतः OpenAI च्या कॉपीराइट केलेल्या डेटाच्या कथित वापरावर टीका केली होती.

Exit mobile version