WHO म्हणतंय, हा आहे भारताचा ‘अमृतमहोत्सव’

WHO म्हणतंय, हा आहे भारताचा ‘अमृतमहोत्सव’

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांनी आरोग्य क्षेत्रातील भारताच्या लक्षणीय कामगिरीची यादी करताना अधोरेखित केले की भारत जगातील औषधनिर्मितीचे, आरोग्यव्यवस्थेचे केंद्र बनणे हे गेल्या ७५ वर्षातील सर्वात मोठे यश आहे.

डॉ.स्वामीनाथन यांनी भारताच्या चार मोठ्या कामगिरींची यादी केली. पोलिओ आणि लसींच्या आधारे प्रतिबंध करता येईल अशा रोगांचे उच्चाटन, माता आणि बालमृत्यू कमी करणे, भारतात सार्वत्रिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे या माध्यमातून भारत जगातील औषध क्षेत्रातील अग्रगण्य देश बनला आहे, अशी नोंद त्यांनी केली आहे.

तथापि, त्यांनी हे स्पष्ट केले की कोविड-१९ महामारीमुळे भारतासह जवळजवळ प्रत्येक देशात आवश्यक आरोग्य सेवांच्या वितरणावर परिणाम झाला आहे. भारतातही काही रोगांच्याबाबत फटका बसला असल्याचे त्या म्हणाल्या.

“येत्या काही महिन्यांत अधिक लक्ष देण्याची गरज आहे. कोरोना आकडेवारीचा एक चांगला डेटा घेणे आवश्यक आहे. केवळ रुग्ण शोधण्यासाठीच नाही, तर भविष्यातील रोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठीसुद्धा हे महत्वाचे आहे.” असं डॉ. स्वामीनाथन म्हणाल्या.

युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंड (युनिसेफ) च्या मते, भारतात कुपोषण हे रोगांचे मूळ आहे. ५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये मृत्यूलाही हे कुपोषणच कारणीभूत आहे. डॉ.स्वामीनाथन यांनी तज्ञांना सावधगिरीने कोरोनाच्या आकडेवारीकडेही लक्ष देण्याची सूचना केली आहे. या विषाणूने अनेक कुटुंबांना उद्धवस्त केले आहे आणि लोकांना गरिबीत ढकलले आहे.

हे ही वाचा:

काय आहे नार्कोटिक जिहाद?

दुबई एक्सपोमध्ये का झाली भारतातल्या हायपरलूपची चर्चा?

अमेरिकेतील मृतांचा आकडा पोहोचला सात लाखांवर

… आणि काबूल पुन्हा हादरले; मशिदीबाहेर बॉम्बस्फोट!

“कोविड महामारीमुळे दारिद्र्याचे प्रमाण देखील वाढले आहे आणि समाजात कुपोषणाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.  गरिबीचा जो वाढता स्तर आहे त्याकडे आपण काळजीपूर्वक पाहायला हवे. गरिबीमुळे अनेक रोगांना निमंत्रण मिळते. शिवाय, टीबीचा धोकाही वाढतो. भारतात कोविड संसर्ग कमी होत आहे आणि गेल्या आठवड्यात दररोज बाधितांची संख्या ३० हजारच्या खाली राहिली आहे.” असंही त्या म्हणाल्या.

Exit mobile version