सिनेटने मंजुरी दिलेले FBI चे भारतीय वंशाचे संचालक काश पटेल कोण आहेत?

व्हाईट हाऊसने एफबीआयचे नवे संचालक म्हणून काश पटेल यांच्या नियुक्तीचे केले स्वागत

सिनेटने मंजुरी दिलेले FBI चे भारतीय वंशाचे संचालक काश पटेल कोण आहेत?

भारतीय वंशाचे काश पटेल यांच्या अमेरिकेतील फेडरल ब्युरो ऑफ इनव्हेस्टिगेशन म्हणजेचं एफबीआय या गुप्तचर संस्थेच्या संचालक पदावरील नियुक्तीला अमेरिकन सिनेटने मंजूरी दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्ष पदाची निवडणुकी जिंकल्यानंतर काश पटेल यांच्याकडे एफबीआयची जबाबदारी सोपवली जाईल अशी घोषणा केली होती, आता यावर सिनेटने देखील शिक्कामोर्तब केले आहे. सिनेटमध्ये झालेल्या मतदानादरम्यान काश पटेल यांना एफबीआयचे पुढील संचालक नियुक्त करण्याच्या बाजूने ५१ मते तर विरोधात ४९ मते पडली.

व्हाईट हाऊसने एफबीआयचे नवे संचालक म्हणून काश पटेल यांची नियुक्ती झाल्याचे म्हणत निर्णयाचे स्वागत केले. तसेच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कायद्याचे राज्य राखण्याच्या अजेंड्याच्या अंमलबजावणीसाठी हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे म्हटले आहे. आतापर्यंत, सिनेटने डोनाल्ड ट्रम्प यांच्या सर्व मंत्रिमंडळ निवडींना मान्यता दिली असून यामुळे रिपब्लिकन पक्षावरील त्यांची पकड अधोरेखित झाली आहे.

काश पटेल यांनी यापूर्वा डिफेंडर आणि न्याय विभागात दहशतवाद विरोधी अभियोक्ता म्हणून काम केले आहे. एफबीआय संचालक म्हणून काश पटेल यांचा कार्यकाळ हा १० वर्षांचा असणार आहे. ट्रम्प यांनी अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी क्रिस्टोफर रे यांनी राजीनामा दिला होता. आता त्यांची जागा काश पटेल यांनी घेतली आहे.

कोण आहेत काश पटेल?

काश पटेल यांचे आई- वडील हे गुजरातहून न्यूयॉर्कच्या गार्डनर सिटी येथे स्थायिक झाले होते. दोघे आधी कॅनडा येथे राहिले नंतर १९७० मध्ये अमेरिकेत गेले. १९८० मध्ये न्यू यॉर्कमध्ये काश पटेल यांचा जन्म झाला. त्यांनी लॉंग आयलंडमधील गार्डन सिटी हायस्कूलमधून पदवी प्राप्त केली. त्यांच्या संरक्षण विभागाच्या प्रोफाइलनुसार, काश पटेल यांनी रिचमंड विद्यापीठातून पदवीपूर्व शिक्षण पूर्ण केले आणि नंतर न्यू यॉर्कला परतले आणि युनायटेड किंग्डममधील युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन फॅकल्टी ऑफ लॉजमधून कायद्याची पदवी आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचे प्रमाणपत्र मिळवले. काश पटेल यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि हाऊस पर्मनंट सिलेक्ट कमिटी ऑन इंटेलिजेंसचे (HPSCI) वरिष्ठ वकील म्हणूनही काम केले आहे.

हे ही वाचा : 

एकनाथ शिंदेंच्या गाडीला बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या दोघांना बुलढाण्यातून अटक

इस्रायलमध्ये बस स्फोटांची मालिका; दोन बसमध्ये आढळली स्फोटके

‘शिवाजी विद्यापीठा’चे ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ नामांतराची आंदोलनाद्वारे मागणी

‘संसद भवन ते सेंट्रल विस्टा’ पुस्तकाचे प्रकाशन

एफबीआयच्या संचालकपदी सिनेटने त्यांची पुष्टी केल्यानंतर, काश पटेल यांनी कृतज्ञता व्यक्त केली आणि एजन्सीची पुनर्बांधणी पारदर्शक, जबाबदार आणि न्यायासाठी वचनबद्ध अशी करण्याचे वचन दिले. दरम्यान, अमेरिकन सिनेट कन्फर्मेशन सुनावणीत काश पटेल यांच्यासोबत त्यांचे आई-वडील, बहीण आणि मैत्रीण अॅलेक्सिस विल्किन्स उपस्थित होते. सुनावणीपूर्वी त्यांनी आपल्या आई- वडिलांचे आशीर्वाद घेतले. तसेच ‘जय श्री कृष्ण’ म्हणत अभिवादनही केले.

छे शीतयुद्ध कसले? हे तर संस्कृती बदलाचे झटके...  | Dinesh Kanji | Eknath Shinde | Devendra Fadnavis

Exit mobile version