जपानचे माजी परराष्ट्र मंत्री फुमियो किशिदा यांनी सत्ताधारी पक्षाच्या नेतृत्वाची निवडणूक जिंकली आहे. जपानचे पुढील पंतप्रधान म्हणून आता फुमियो किशिदा पदभार सांभाळणार आहेत.
किशिदा यांनी पक्षाचे विद्यमान नेते पंतप्रधान योशिहिदे सुगा यांची जागा घेतली आहे. सुगा गेल्या सप्टेंबरमध्ये पदभार स्वीकारल्यानंतर केवळ एक वर्ष पंतप्रधानपदी राहून पदभार सोडत आहेत.
लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीचे नवे नेते म्हणून, किशिदा यांची सोमवारी संसदेत पुढील पंतप्रधान म्हणून निवड होणे निश्चित आहे. जपानच्या संसदेत त्यांचा पक्ष आणि आघाडीचे भागीदार बहुमतात आहेत.
पहिल्या फेरीत दोन महिला उमेदवार साने ताकाइची आणि सेको नोडा यांच्या पुढे गेल्यानंतर किशिदा यांनी लसीकरण मंत्री तारो कोनो यांना पराभूत केले.
नवीन नेत्याला पक्षाची हलगर्जीपणाची प्रतिमा देखील बदलण्याची गरज आहे. कोरोना व्हायरस आणि लसीकरण चुकीच्या पद्धतीने हाताळल्यामुळे आणि गेल्या उन्हाळ्यात टोकियोमध्ये ऑलिम्पिक आयोजित करण्याचा आग्रह धरल्याने जनतेमध्ये पंतप्रधान योशीहिदे सुगा यांच्याबद्दल राग आहे.
दीर्घकाळ सत्तेत असलेल्या लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीला दोन महिन्यांच्या आत येणाऱ्या निवडणुका होण्यापूर्वी जनतेचा पाठिंबा पुन्हा आपल्याकडे वळवण्याची गरज आहे. असे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे.
हे ही वाचा:
अमेरिकेचे लष्करी नेतृत्व आणि बायडन यांच्यातच मतभेद?
लडाख सीमेवर चीनची पुन्हा लुडबुड सुरू!
नवजोत सिंह सिद्धू यांची ‘हिट विकेट’
जपानी लोकशाहीच्या इतिहासात सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिलेल्या शिंजो आबे यांनी गेल्या वर्षी राजीनामा दिल्यानंतर सुगा यांनी पदभार स्वीकारला होता.