अमेरिकेतील मिशिगन येथील विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या एका भारतीय विद्यार्थ्यासह चार आशियाई विद्यार्थ्यांनी ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटला दाखल केला आहे. या विद्यार्थ्यांचा विद्यार्थी इमिग्रेशन दर्जा चुकीच्या पद्धतीने रद्द केल्यानंतर अमेरिकेतून संभाव्य हद्दपारीविरुद्ध हा खटला दाखल केला आहे. भारताचा चिन्मय देवरे, चीनचे झियांग्युन बु, किउई यांग आणि नेपाळच्या योगेश जोशी यांनी गृह सुरक्षा विभाग आणि इमिग्रेशन अधिकाऱ्यांविरुद्ध खटला दाखल केला आहे.
चिन्मय देवरे, झियांग्युन बु, किउई यांग आणि नेपाळमधील योगेश जोशी यांनी अमेरिकेचे गृह सुरक्षा विभाग (DHS) आणि इमिग्रेशन अधिकाऱ्यांविरुद्ध खटला दाखल केला. त्यांनी स्टुडंट अँड एक्सचेंज व्हिजिटर इन्फॉर्मेशन सिस्टम (SEVIS) मधील त्यांचा विद्यार्थी इमिग्रेशन दर्जा योग्य सूचना आणि स्पष्टीकरण न देता बेकायदेशीरपणे रद्द केल्याचा आरोप केला आहे.
विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मिशिगन येथील अमेरिकन सिव्हिल लिबर्टीज युनियनने (एसीएलयू) सांगितले की, ज्या विद्यार्थ्यांचा एफ- १ विद्यार्थी इमिग्रेशन दर्जा बेकायदेशीरपणे आणि अचानक ट्रम्प प्रशासनाने कोणत्याही वैध कारणाशिवाय आणि सूचना न देता संपवला आहे, त्यांच्या वतीने त्यांनी आपत्कालीन मनाई आदेशाची विनंतीसह एक संघीय खटला दाखल केला आहे. या विद्यार्थ्यांना पुन्हा इमिग्रेशन दर्जा बहाल करण्याची विनंती या खटल्यात न्यायालयाला करण्यात आली आहे जेणेकरून ते त्यांचे शिक्षण पूर्ण करू शकतील आणि हद्दपारीचा धोका टाळू शकतील.
दरम्यान न्यायालयात दाखल केलेल्या खटल्यात म्हटले आहे की, “कारवाई करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांपैकी कोणावरही अमेरिकेत कोणताही गुन्हा, आरोप किंवा शिक्षा झालेली नाही. कोणीही कोणत्याही इमिग्रेशन कायद्याचे उल्लंघन केलेले नाही. तसेच ते कोणत्याही राजकीय मुद्द्यावरून विद्यापीठातील निदर्शनांमध्ये सहभागी नव्हते.”
हे ही वाचा :
“दंगलीचे आवाहन मशिदीच्या लाऊडस्पीकरवरून करण्यात आले होते”
एसआयटी करणार मुर्शीदाबाद दंगलीची चौकशी
संसदेत मंजूर झालेला कायदा राज्यात लागू न करण्याचा अधिकार ममतांना कोणी दिला?
“जर अमेरिका टॅरिफ नंबर गेम खेळत राहिली तर…” काय म्हणाला चीन?
अमेरिकन सिव्हिल लिबर्टीज युनियनने (एसीएलयू) दाखल केलेल्या तक्रारीनुसार, चिन्मय देवरे २००४ मध्ये पहिल्यांदा त्याच्या कुटुंबासह H- 4 डिपेंडंट व्हिसावर अमेरिकेत दाखल झाला. तो आणि त्याचे कुटुंब २००८ मध्ये अमेरिका सोडून गेले आणि नंतर तो २०१४ मध्ये त्याच्या कुटुंबासह (पुन्हा H- 4 डिपेंडंट व्हिसावर) परतला. चिन्मय देवरे हा २१ वर्षांचा वेन स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये पदवीधर विद्यार्थी आहे, जिथे तो ऑगस्ट २०२१ पासून संगणक शास्त्राचा अभ्यास करत आहे. तो मूळ भारताचा नागरिक आहे. मे २०२२ मध्ये, देवरेने कायदेशीररित्या F- 1 विद्यार्थी दर्जासाठी अर्ज केला आणि त्याला त्याच्या H- 4 दर्जाची मुदत संपत असताना F- 1 विद्यार्थी दर्जामध्ये संक्रमण करण्याची परवानगी देण्यात आली. चिन्मय देवरे मे २०२५ मध्ये त्याचा अभ्यासक्रम पूर्ण करून पदवीधर होईल. तो सध्या कॅन्टनमध्ये कुटुंबासह राहतो.