पश्चिम आशियामधील तणाव अद्याप शमलेला नसून इस्रायलमधील तेल अवीववर क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे येमेनला सध्या जोरदार बॉम्बफेकीचा सामना करावा लागत आहे. इस्रायली हल्ल्यांमुळे येमेनमधील परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. अशातच जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) महासंचालक टेड्रोस अधानोम गेब्रेयसस हे येमेनमध्ये दौऱ्यासाठी गेले होते. यावेळी ते एका हल्ल्यातून थोडक्यात बचावले आहेत. येमेनमधील लोकांच्या आणि कैद्यांच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी टेड्रोस अधानोम गेब्रेयसस गेले होते. या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. टेड्रोस म्हणाले की, येमेनमधील साना विमानतळावर विमानात चढत असताना हा हल्ला झाला.
डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस यांनी ट्विटरवर पोस्ट केले की आमच्या टीमने येमेनमधील आरोग्य आणि मानवतावादी परिस्थितीचे मूल्यांकन करण्याचे आणि कैद्यांच्या सुटकेसाठी वाटाघाटी करण्याचे मिशन पूर्ण केले आहे. विमानतळावर बॉम्बस्फोट झाला तेव्हा आम्ही सनाहून टेक ऑफ करणार होतो. यामध्ये आमच्या विमानातील एक क्रू मेंबर जखमी झाला आहे. तसेच विमानतळावर दोन जणांचा मृत्यू झाला असून इतर अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. आम्ही विमानतळाच्या दुरुस्तीची वाट पाहत आहोत जेणेकरून आम्हाला पुढील प्रवास करता येईल. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांसोबत आमच्या संवेदना आहेत.
हे ही वाचा:
मथुरा येथील शिव मंदिरातील मूर्तींची विटंबना; देवी- देवतांच्या फोटोंचीही तोडफोड
भारताचा मोठा दुश्मन हाफिज अब्दुल रहमान मक्कीचा मृत्यू
मनमोहन सिंग एक दयाळू व्यक्ती, अभ्यासू अर्थतज्ञ आणि सुधारणांना समर्पित नेते म्हणून स्मरणात राहतील
दिल्ली विद्यापीठात हिंदू अभ्यासात पीएचडी कार्यक्रम सुरू होणार
संतप्त झालेल्या इस्रायलने वेस्ट बँक आणि येमेनच्या अंतर्गत भागात हुथी लष्करी तळांवर हल्ले केले आहेत. इस्रायल डिफेन्स फोर्सेसने (IDF) सांगितले की, हे हल्ले पंतप्रधान, संरक्षण मंत्री आणि जनरल स्टाफच्या मान्यतेने करण्यात आले. या हल्ल्यांमध्ये प्रामुख्याने हुथी लष्करी पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यात आले. त्यात सनाच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचा समावेश आहे. इस्रायली हवाई दलाने पश्चिम किनाऱ्यावरील अल- हुदायदाह, सलीफ आणि रास कनातीब बंदरांवरही हल्ला केला.