वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे (WHO) महासंचालक डॉ. टेड्रोस अधानोम घेब्रेयसस हे भारतात येणार आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या कोरोनामुळे झालेल्या रुग्णांचे मृत्यू मोजण्याच्या पद्धतीवर भारताने आक्षेप घेतला होता. याच पार्श्वभूमीवर डब्ल्यूएचओ प्रमुख गुजरातला भेट देणार आहेत. डॉ. घेब्रेयसस हे सोमवार, १८ एप्रिल रोजी गुजरातच्या तीन दिवसीय दौऱ्यावर येणार आहेत.
या दौऱ्यावेळी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत काही कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. डॉ. घेब्रेयसस हे आज राजकोटला पोहोचतील. त्यानंतर उद्या, १९ एप्रिल रोजी ते जामनगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. ते WHO च्या ग्लोबल सेंटर फॉर ट्रॅडिशनल मेडिसिनच्या (GCTM) पायाभरणी समारंभाला उपस्थित राहणार आहेत. GCTM ही पारंपारिक औषधांसाठी जगातील पहिली आणि एकमेव जागतिक आऊटपोस्ट असल्याचे राजकोटचे जिल्हाधिकारी महेश बाबू म्हणाले.
नुकत्याच आलेल्या न्यूयॉर्क टाईम्सच्या रिपोर्टनुसार, भारत WHO ला कोरोनामुळे जगभरातील मृत्यूची संख्या सार्वजनिक करण्यापासून रोखत आहे. या रिपोर्टमध्ये भारतात कोरोनामुळे मरण पावलेल्या लोकांचा अधिकृत आकडा ५.२० लाख आहे. तर, WHO च्या अंदाजानुसार, भारतात ४० लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. हा अहवाल समोर आल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. कोरोना विषाणूच्या जागतिक महामारीमुळे मृत्यूची गणना करण्याच्या WHO च्या पद्धतीवर भारताने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. याच पार्श्वभूमीवर WHO चे प्रमुख भारतात येणार आहेत.
हे ही वाचा:
शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नीची आत्महत्या
जेम्स लेन म्हणतो, मी बाबासाहेब पुरंदरेंशी कधीही बोललो नाही!
पत्राचाळजवळ काय होणार? भाजपाचे पोलखोल आंदोलन संध्याकाळी
‘राज ठाकरे घेणार उद्धव ठाकरेंची जागा’
मॉरिशसचे पंतप्रधानही या दरम्यान भारत दौऱ्यावर येणार आहेत. राजकोटचे महापौर प्रदिव दाव यांनी सांगितले की, मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जगन्नाथ हे देखील सोमवारी राजकोटला पोहोचणार असून त्यांचे विमानतळावर सांस्कृतिक कार्यक्रमांनी स्वागत करण्यात येणार आहे.