कतारमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेले भारतीय नौदलाचे ‘ते’ आठ माजी अधिकारी कोण?

भारतातील त्यांच्या सेवाकाळात कोणताही ठपका नसल्याची माहिती

कतारमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेले भारतीय नौदलाचे ‘ते’ आठ माजी अधिकारी कोण?

कतारमधील एका कंपनीत काम करत असताना कतारने ऑगस्ट २०२२ मध्ये इस्रायलसाठी हेर म्हणून काम केल्याच्या संशयावरून भारताच्या आठ माजी नौदल अधिकाऱ्यांना ताब्यात घेतले होते. कतारने या नौदल अधिकाऱ्यांना एका वर्षाहून अधिक काळ नजरकैदेत देखील ठेवले होते. त्यानंतर कतारमधील एका न्यायालयाने गुरुवारी या आठ माजी भारतीय नौदलाच्या कर्मचार्‍यांना फाशीची शिक्षा ठोठावली. कतारची वेबसाइट अल-जजीराने ही माहिती दिली आहे.

माजी नौदल अधिकाऱ्यांना सुनावण्यात आलेल्या या शिक्षेनंतर जगभरात खळबळ उडाली आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने देखील या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले आहे. भारत सरकार या सर्व माजी नौदल अधिकाऱ्यांना कायदेशीर मदत उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती आहे.

भारताच्या ज्या माजी नौदल अधिकाऱ्यांना कतारच्या न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे त्या अधिकाऱ्यांचा भारतातील सर्विस रेकॉर्ड खूप चांगला आहे. त्यांच्यावर कधीही कुठलाही ठपका नसल्याची माहिती समोर आली आहे. व्यावसायिक सतर्कता, वेगवान कामकाज आणि शार्प माइंडमुळे यांच्यातील एका अधिकाऱ्याला राष्ट्रपती पुरस्कारने सन्मानित करण्यात आलं होतं. एक अधिकारी तामिळनाडू येथील डिफेंस सर्विसेज स्टाफ कॉलेज वेलिंगटनमध्ये आपल्या सेवाकाळात इंस्ट्रक्टर होते. दुसरा आणखी एक अधिकारी आपल्या सेवाकाळात भारतीय युद्धनौका आयएनएस विराटवर फायटर कंट्रोल आणि नेविगेटिंग ऑफिसरच्या रोलमध्ये होता.

अधिकारी कतारला कसे गेले?

या भारतीय नौदलातील अधिकाऱ्यांनी साधारण २० वर्षे कर्तव्य बजावले आहे. त्यानंतर त्यांनी स्वेच्छा निवृत्ती स्वीकारली. त्यानंतर चांगल्या संधीच्या शोधात कतारची प्रायव्हेट कंपनी अल दहारासोबत काम सुरू केले. अल दहारा कंपनीत हे अधिकारी मागच्या काही वर्षांपासून कतारच्या नौदल अधिकाऱ्यांना ट्रेनिंग देत होते.

हे ही वाचा.. 

जयंत पाटील एका घटनेमुळे आमच्या सोबत आले नाहीत, अन्यथा ते आमच्या सोबत असते!

भेसळखोरांवर अन्न व औषध प्रशासनाचे लक्ष

वडाळ्यात सापडला महिलेचा तुकडे केलेला मृतदेह

मृत्युदंडाच्या शिक्षेपासून आठ भारतीय वाचू शकतील का?

आठ अधिकाऱ्यांची नावे

  1. कॅप्टन नवतेज सिंग गिल
  2. कॅप्टन सौरभ वशिष्ठ
  3. कॅप्टन बीरेंद्र कुमार वर्मा
  4. कमांडर पुर्णेंदू तिवारी
  5. कमांडर सुगुनकर पाकला
  6. कमांडर संजीव गुप्ता
  7. कमांडर अमित नागपाल
  8. नाविक रागेश
Exit mobile version