तालिबानचे करविते ‘धनी’ कोण कोण?

तालिबानचे करविते 'धनी' कोण कोण?

अफगाणिस्तानमध्ये तालिबानने पूर्णपणे कब्जा केल्यानंतर जगभरातून या घटनेबद्दल भीती आणि खेद व्यक्त केला जात आहे. तालिबानच्या राज्यात महिला आणि अल्पसंख्यांकांवर अनन्वित अत्याचार केले जातात हा तालिबानचा इतिहासच आहे. परंतु जगभरातून व्यक्त केली जाणारी भीती आणि खेद याला जर का कोणी अपवाद असेल तर ते आहेत पाकिस्तान, चीन आणि इराण.

या तिन्ही देशांनी तालिबानशी तालिबानला थेट मदत, मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याची इच्छा किंवा मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केलेले आहेत. तालिबान आणि या तीन देशांच्या संबंधांचा जागतिक स्तरावर काय परिणाम होतो हे पाहावे लागेल. आज हे संबंध मैत्रिपूर्ण वाटत असले तरी तालिबानशी मैत्री या तीन देशांच्या अंगाशी येणार का, हादेखील महत्त्वाचा प्रश्न आहे.

पाकिस्तानने ‘इस्लाम इस्लाम भाई भाई’ या नावाखाली कट्टर तालिबान्यांना अफगाणिस्तान मधील सरकार उलथून टाकून सत्ता प्रस्थापित करण्यासाठी सर्व प्रकारचं सहकार्य केलं. परंतु पाकिस्तानच्या या ‘मास्टर प्लॅन’मध्ये एक मोठी अडचण आहे. तालिबानचे बहुतांश दहशतवादी हे पश्तून वंशाचे आहेत. परंतु अफगाणिस्तानपेक्षाही जास्त पश्तून वंशाचे लोक हे पाकिस्तानमध्ये राहतात. एवढंच नाही तर पाकिस्तानचा अफगाणिस्तानच्या सीमेलगत असलेला म्हणजेच खैबर पख्तूनख्वा भागामध्ये पश्तून नागरिक राहतात. त्यातच अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यामध्ये असलेली ‘ड्यूरॅन लाईन’ म्हणजेच सीमारेषा अफगाणिस्तानने कधीही मान्य केलेली नाही. त्यामुळेच अफगाण सरकार जरी तालिबान्यांचं असलं तरीही पाकिस्तानला सीमा विवादांमध्ये पडावच लागेल.

हे ही वाचा:

मास्क असेल तरच पुष्पगुच्छ घेणार

तालिबानपासून मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी काय करत आहेत महिला?

बूस्टर डोसबद्दल डब्ल्यूएचओने केले ‘हे’ महत्वाचे वक्तव्य

अफगाणिस्तानमध्ये लोकशाही नाही तर, केवळ शरिया

पाकिस्तानसारख्या कंगाल देशाला तालिबानला संपूर्णपणे मदत करणे हे तेव्हाच शक्य झालं जेव्हा चीनने त्यांना आर्थिक मदत केली होती. चीनकडे असलेल्या अमाप पैशाचा वापर त्यांनी तालिबानला शस्त्रास्त्र पुरवण्यासाठी निश्चितपणे केलेला आहे.

तालिबानसारख्या सापाला दूध पाजण्याचे काम हे या तीन देशांनी मिळून केलेले आहे. परंतु हा साप याच तीन देशांना कधी डसतो? हा केवळ प्रश्न उरला आहे. परंतु हा साप त्याला दूध पाजणाऱ्यांना डसणार याबाबत शंकाच नाही.

Exit mobile version