उत्तर प्रदेशातील चितांचे फोटो अमेरिकेतील ‘न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर भारतातील कोरोनाच्या स्थितीची खिल्ली उडविणाऱ्या भारतीय प्रसारमाध्यमांनी जगभरात यापेक्षाही अधिक भयावह स्थिती होती, हे जाणीवपूर्वक लपवल्याचे उघड झाले आहे.
‘टाइम्स नाऊ’वर पत्रकार सुशांत सिन्हा यांनी वॉशिंग्टनमध्ये अमेरिकेतील कोरोनाच्या स्थितीची भयानकता दाखविणारा एक व्हीडिओ दाखवत त्यावर भाष्य केले आहे. त्यात दाखविण्यात आले आहे की, एका मैदानात हिरवळीवर लांबच लांब अंतरापर्यंत छोटे पांढरे झेंडे लावलेले दिसत आहेत. अमेरिकेत कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या ६ लाख ७८ हजार ५८४ नागरिकांच्या नातेवाईकांनी, मुलांनी, नातवांनी या झेंड्यांवर त्यांच्या स्मृत्यर्थ संदेश लिहिला आहे. कोरोनामुळे अमेरिकेत जो हाहाःकार उडाला त्याचे हे चित्रण आहे. पण हे भारतातील कोणत्याही प्रसारमाध्यमांनी दाखविले नाही. पण उत्तर प्रदेशात जळत असलेल्या चितांचे फोटो मात्र सर्वत्र झळकले एवढेच नव्हे तर परदेशातील वर्तमानपत्रातही ते विकले गेले. त्यासाठी फोटो एजन्सींनी हजारो डॉलर किंमत लावली. त्याबद्दल या व्हीडिओतून सखेद आश्चर्य व्यक्त करण्यात आले आहे.
हे ही वाचा:
महिला पोलिस आता ‘आठ तास’ ड्युटीवर
२२ ऑक्टोबरपासून तिसरी घंटा आणि लाईट्स, कॅमेरा, ऍक्शन…
योगी सरकारची लसीकरणात कोटी कोटी उड्डाणे
भारतातील ‘हे’ रेल्वे स्थानक चालते १००% सौर उर्जेवर!
जगात सर्वाधिक शक्तिशाली असलेल्या अमेरिकेला जिथे कोरोनाचा कहर रोखता आला नाही तिथे इतर गरीब, विकसनशील देशांची काय कथा, असा सवालही यानिमित्ताने उपस्थित होत आहे. या मैदानात या मृत्युमुखी नागरिकांचा सन्मान म्हणून मोठा स्तंभही उभारण्यात आलेला व्हीडिओत दिसतो. पण असा कोणताही सन्मान किंवा त्या मृतांना श्रद्धांजली ना भारतात या पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या प्रसारमाध्यमांनी वाहिली किंवा परदेशातही त्याबद्दल दुःख व्यक्त केले गेले नाही. उलट त्याचे राजकारणच केले गेल्याचे दिसले.