भारताचा शेजारी देश पाकिस्तान हा सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून पाकिस्तानात महागाईने उच्च पातळी गाठली आहे. मुलभूत सुविधा मिळवण्यासाठीही पाकिस्तानच्या नागरिकांना वणवण फिरावे लागत असल्याचे चित्र आहे. अनेकदा पाकिस्तानी नागरिक सोशल मीडियाच्या माध्यमातून भारत आणि पाकिस्तान यांची तुलना करून पाकिस्तानी सरकारवर निशाणा साधत असतात. दोन्ही देश एकाचवेळी स्वतंत्र झाले पण दोन्ही देशांची आजची स्थिती पाहता यात जमीन- आसमानचा फरक आहे, असं तिकडचे नागरिक म्हणत असतात. हाच मुद्दा आता पाकिस्तानच्या संसदेत जाऊन पोहचला आहे. पाकिस्तानच्या संसदेत भारताच्या प्रगतीचे उदाहरण देऊन देशावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
पाकिस्तानचे विरोधी पक्षनेते आणि कट्टर धार्मिक नेते मौलाना फजल ऊर रेहमान यांनी पाकिस्तानच्या संसदेत भारतासाठी गौरवोद्गार काढले आहेत. भारत जागतिक महाशक्ती होण्याच्या जवळ पोहचला आहे तर पाकिस्तान दिवाळखोरीपासून वाचण्यासाठी भीक मागत असल्याचं म्हणत त्यांनी पाकिस्तानी नेत्यांना आरसा दाखवला आहे.
जमियत उलेमा-ए-इस्लाम फजलचे (JUI-F) प्रमुख मौलाना रेहमान यांनी संसदेत जोरदार भाषण केले. “ऑगस्ट १९४७ मध्ये भारत आणि पाकिस्तानला एकत्र स्वातंत्र्य मिळाले. आज भारत जागतिक महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहत आहे, तर आपण दिवाळखोरी टाळण्यासाठी भीक मागत आहोत. याला जबाबदार कोण? पाकिस्तानविषयीचे निर्णय दुसरा कोणी तरी घेतो आणि त्यासाठी पाकिस्तानमधील राजकारण्यांना दोषी ठरविण्यात येते. भिंतींच्या मागे काही शक्ती आहेत जे आपल्यावर नियंत्रण ठेवतात आणि ते निर्णय घेतात जेव्हा आपण फक्त कठपुतळी आहोत,” अशी टीका त्यांनी लष्करावर केली आहे.
#BREAKING: Top Pakistani Politician Maulana Fazal Ur Rehman inside Pakistan Parliament says while India is inching closer to become a Global Superpower, Pakistan is begging before the world to save it from devastation. Rehman also takes an indirect dig at the Pakistan Army. pic.twitter.com/c1euemAtVM
— Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) April 29, 2024
हे ही वाचा:
शिवसेनेचं ठरलं; उत्तर-पश्चिम मुंबईमधून रवींद्र वायकरांना लोकसभेचे तिकीट
संदेशखाली प्रकरणातील पीडित, भाजपा उमेदवार रेखा पात्रा यांना ‘एक्स-श्रेणी’चे सुरक्षाकवच
राज्यघटनेच्या प्रस्तावनेतून ‘समाजवादी’, ‘धर्मनिरपेक्ष’ शब्द वगळण्याची मागणी
अमित शहांचा बनावट व्हिडिओ: आसाम काँग्रेसच्या वॉर रूमचे समन्वयक रीतम सिंग अटकेत
२०१८ मधील पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणूकीवर रेहमान यांनी आक्षेप घेतला होता. त्यांनी आताच्या सार्वत्रिक निवडणुकीवर पण आक्षेप नोंदवला होता. मौलाना फजल ऊर रेहमान यांचा पक्ष पीटीआयचा कट्टर विरोधक होता. त्याने इमरान खान यांना पंतप्रधान पदावरुन हटविण्यासाठी पाकिस्तानमध्ये मोठी रॅली सुद्धा काढली होती.