27 C
Mumbai
Wednesday, January 8, 2025
घरदेश दुनियाजेंव्हा कमला हॅरिस पाकिस्तानी दहशतवादावर बोलतात...

जेंव्हा कमला हॅरिस पाकिस्तानी दहशतवादावर बोलतात…

Google News Follow

Related

अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या पहिल्या बैठकीत स्वतःहून पाकिस्तानच्या दहशतवादाच्या भूमिकेचा उल्लेख केला. हॅरिस यांनी नमूद केले की पाकिस्तानमध्ये दहशतवादी गट कार्यरत आहेत. “जेव्हा दहशतवादाचा मुद्दा समोर आला, तेव्हा उपराष्ट्रपतींनी स्वत: त्या संदर्भात पाकिस्तानच्या भूमिकेचा उल्लेख केला.” असे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला यांना पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेच्या उपराष्ट्रपती यांच्यातील महत्त्वाच्या बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले .

पीएम मोदींशी हॅरिस यांच्या भेटीदरम्यान दहशतवादाबाबत पाकिस्तानच्या भूमिकेचा मुद्दा उपस्थित झाला का? असे जेव्हा शृंगला यांना विचारण्यात आले तेव्हा त्यांनी या घटनेची पुष्टी केली आणि सांगितले की, अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींनी असेही नमूद केले की पाकिस्तानमध्ये दहशतवादी गट कार्यरत आहेत.

हे ही वाचा:

संजयजी…आता कोणाचे थोबाड फोडायचे?

‘ऑकस’नंतर बायडन-मॅक्रॉन “मैत्रीपूर्ण” फोन

क्वाड लवकरच भारतात बनवणार एक अब्ज लसी

LIC IPO: एलआयसी आयपीओ मधून चीनी ‘कम’

“त्यांनी (हॅरिस) पाकिस्तानला दहशतवादावर कारवाई करण्यास सांगितले जेणेकरून याचा अमेरिकेच्या आणि भारताच्या सुरक्षेवर परिणाम होणार नाही,” असे भारताच्या परराष्ट्र सचिवांनी म्हटले आहे. “पाकिस्तानकडून अनेक दशकांपासून भारत दहशतवादाचा बळी ठरला आहे आणि अशा दहशतवादी गटांना पाकिस्तानच्या पाठिंब्यावर बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज आहे याविषयीच्या पंतप्रधानांच्या ब्रीफिंगशी त्या सहमत होत्या.”

कमला हॅरिसने नमूद केले की, दोन देशांतील लोकांच्या हितासाठी लोकशाहीचे संरक्षण करणे हे दोन्ही राष्ट्रांवर बंधनकारक आहे. पंतप्रधान मोदींनी गुरुवारी व्हाईट हाऊसमध्ये उपराष्ट्रपती हॅरिस यांच्यासोबत बैठक घेतली, ज्या दरम्यान त्यांनी भारत-अमेरिका धोरणात्मक भागीदारी आणखी वाढवण्याचा निर्णय घेतला आणि लोकशाही, अफगाणिस्तान आणि इंडो-पॅसिफिकला असलेल्या धोक्यांसह एकमेकांना पूरक हितसंबंधांच्या जागतिक समस्यांवर चर्चा केली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा