30 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरदेश दुनियाआता ग्रुप एडमिन ठरणार 'राजा'

आता ग्रुप एडमिन ठरणार ‘राजा’

Google News Follow

Related

व्हाट्सअँप लवकरच एक नवीन फिचर आणणार आहे. यामध्ये ग्रुप ऍडमिनिस्ट्रेटरना अधिक नियंत्रण मिळणार आहे. ग्रुप ऍडमीन ग्रुपच्या इतर सदस्यांनी पाठवलेले संदेश डिलिट करू शकणार आहे. या नवीन वैशिष्ट्याची व्हाट्सअँप सध्या चाचणी करत आहे.

सध्या व्हाट्सअँपमध्ये प्रत्येक वापरकर्त्याने पाठवलेले संदेश स्वतः हटवण्याचे वैशिष्ट्य आहे.  तथापि, यात लवकरच अनेक वैशिष्ट्य येण्याची शक्यता आहे.

WABetainfo च्या मते, मेटा मालकीचे हे अँप एका नवीन वैशिष्ट्याची चाचणी करत आहे. या नवीन वैशिष्टयामुळे ग्रुप ऍडमीन ग्रुपमधील सदस्यांनी पाठवलेले  नको असलेले किंवा अयोग्य मेसेज डिलीट करू शकणार आहे. आणि ऍडमीनने संदेश डिलीट केल्यावर, ज्या सदस्यांचे संदेश डिलीट केले त्या सदस्याला सूचित केले जाणार की, ‘ ग्रुप ऍडमीनने संदेश डीलिट केले. ‘

हे ही वाचा:

प्रसिद्ध तबलावादक पंडित अनिंदो चॅटर्जी यांचा पद्मश्री स्वीकारण्यास नकार

समाजसेवक आणि साहित्यिक अनिल अवचट यांचे निधन

दाढ्या कुरवळण्याचा प्रकार सहन करणार नाही

२ हजाराच्या बनावट नोटा छापत होते; पोलिसांनी आवळल्या मुसक्या

व्हाट्सअँप प्रत्येकासाठी ते कधी उपलब्ध करून देऊ इच्छित आहे अद्याप स्पष्ट नाही. दरम्यान, सध्या सुरु असलेल्या वैशिष्ट्यामधून संदेश डिलिट करण्याची वेळ मर्यादा काढून टाकण्याचा विचार व्हाट्सअँप करत आहे. वापरकर्त्यांना संदेश पाठवल्यानंतर तो हटवण्यासाठी ६८ मिनिटांचा कालावधी आहे. भविष्यात व्हाट्सअँप कोणत्याही वेळी आणि कधीही पाठवलेला संदेश डिलिट करण्याची परवानगी देऊ शकते.

गेल्या काही आठवड्यांमध्ये, व्हाट्सअँप ने अनेक नवीन वैशिष्ट्ये आणि सुधारणा केल्या आहेत. व्हाट्सअँपला गेल्या महिन्यात भारतातील ४० दशलक्ष वापरकर्त्यांना व्हाट्सअँप पे, UPI-समर्थित पेमेंट सेवा, विस्तारित करण्यासाठी नियामक मान्यता मिळाली आहे. त्यानंतर यूएसमधील पेमेंटसाठी नोव्ही वॉलेट एकत्रीकरण, व्हॉइस संदेशांचे पूर्वावलोकन करण्याची क्षमता आणि  इतर अद्यतने या महिन्यात व्हाट्सअँपने केली आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा