सोळाव्या जी-२० शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी दोन दिवसांच्या रोम दौऱ्यावर आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी व्हॅटिकन सिटी येथे पोप फ्रान्सिस यांची प्रत्यक्ष भेट घेणार आहेत.
या दोघांमध्ये शिष्टमंडळ-स्तरीय बैठक होणार आहे. ज्या दरम्यान पंतप्रधान मोदी आणि पोप फ्रान्सिस हे अनेक जागतिक मुद्द्यांवर आणि कोविड-१९ सारख्या समस्यांच्या संदर्भात विविध क्षेत्रांवर चर्चा करणार आहेत.
पंतप्रधानांच्या इटलीतील व्यस्ततेच्या तपशीलांची माहिती देताना परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी शुक्रवारी पत्रकारांना सांगितले की, “पंतप्रधानांची एक बैठक असेल. ते पोप फ्रांसिस यांची भेट घेतील. त्यानंतर ते ठराविक कालावधीनंतर, शिष्टमंडळ-स्तरीय चर्चेमध्ये सहभाग घेतील.”
श्रृंगला म्हणाले की व्हॅटिकनने चर्चेसाठी कोणताही अजेंडा निश्चित केलेला नाही. “माझा विश्वास आहे की जेव्हा तुम्ही पोपशी चर्चा करता तेव्हा परंपरेचा अजेंडा नसतो. आणि आम्ही त्याचा आदर करतो. मला खात्री आहे की जे मुद्दे चर्चिले जातील, ते सामान्य जागतिक दृष्टीकोन आणि आपल्या सर्वांसाठी महत्वाचे असलेल्या महत्वाच्या विषयांवर चर्चा करतील.” ते पुढे म्हणाले.
“कोविड-१९, आरोग्य समस्या, या विषयांवर आपण एकत्र कसे काम करू शकतो. या विषयांवर चर्चा होऊ शकते.” श्रिंगला पुढे म्हणाले. गुरुवारी, पंतप्रधान मोदींनी त्यांच्या दौऱ्यापूर्वीच्या निवेदनात म्हटले होते की ते २९ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान रोम आणि व्हॅटिकन सिटीला भेट देणार आहेत.
हे ही वाचा:
‘त्याच्या उत्पन्नातून एसटी चालवू शकतो एवढे त्याने कमावले आहे’
पोलिस कल्याण निधीतून पोलिसांना ७५० रुपयांची भरगच्च ‘दिवाळी भेट’
“माझ्या इटली भेटीदरम्यान, मी व्हॅटिकन सिटीलाही भेट देईन, पोप फ्रान्सिस यांची भेट घेईन आणि परराष्ट्र सचिव, कार्डिनल पिएट्रो पॅरोलिन यांना भेटेन.” असे पंतप्रधान मोदी म्हणाले. रोमहून पंतप्रधान मोदी, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या निमंत्रणावरून ब्रिटनमधील ग्लासगो येथे जातील.