अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांची सत्ता आल्यानंतर त्यांनी महत्त्वाचे आणि मोठे निर्णय घेण्याचा धडाका लावला आहे. एकीकडे ट्रम्प यांनी अमेरिकेत राहणाऱ्या बेकायदेशीर स्थलांतरितांना हद्दपार करण्याच्या मोहिमेला आक्रमक केलेलं असताना दुसरीकडे त्यांनी लवकरच गोल्ड कार्ड योजना सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे. ही योजना ग्रीन कार्डच्या धर्तीवर सुरू करण्यात येत असून त्यात अतिरिक्त लाभही दिला जाणार आहे. या योजनेमुळे अमेरिकेत नागरिकता घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी माध्यमांना संबोधित करताना सांगितले की, आम्ही लवकरच गोल्ड कार्ड विकणार आहोत. हे ग्रीन कार्डसारखेच गोल्ड कार्ड असेल. त्याची किंमत ५ मिलियन डॉलर इतकी असेल. या कार्डच्या माध्यमातून ग्रीन कार्डसारखेच लाभ दिले जातील त्याशिवाय काही अतिरिक्त लाभही मिळणार आहेत. पुढील २ आठवड्यात ही योजना सुरू केली जाईल. हा नवीन व्हिसा कार्यक्रम यशस्वी आणि श्रीमंत व्यक्तींना नक्कीच आकर्षित करेल, जे केवळ अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकच करणार नाहीत, तर देशाचा कर सुद्धा भरतील आणि रोजगार निर्मितीला देखील हातभार लावतील. या कार्यक्रमामुळे देशाची अर्थव्यवस्था सुधारेल, ज्याचा फायदा व्यवसाय आणि कर्मचारी वर्ग दोघांना होईल, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे.
हे ही वाचा :
‘दिल्ली लुटली’, कॅगच्या अहवालानंतर भाजपचा ‘आप’वर निशाणा!
द्वारकामधील भिडभंजन भवनेश्वर महादेव मंदिरातील शिवलिंग गेले चोरीला
पाकिस्तानात पोलिसांचे बंड; म्हणाले चॅम्पियन्स ट्रॉफीत काम करणार नाही!
संतोष देशमुख हत्या प्रकरणात वकील उज्ज्वल निकम विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्त
वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक यांनी या प्रस्तावाविषयी बोलताना सांगितले की, ‘ट्रम्प गोल्ड कार्ड’ हे विद्यमान EB- 5 व्हिसाची जागा घेईल, जो गेल्या ३५ वर्षांपासून कार्यरत आहे. १९९० मध्ये EB- 5 कार्यक्रम तयार करण्यात आला होता, ज्यामध्ये १० किंवा अधिक लोकांना रोजगार देणाऱ्या यूएस व्यवसायांमध्ये, किमान १ दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करणाऱ्यांना ग्रीन कार्ड देऊन परदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन दिले होते. मात्र EB- 5 प्रोग्राम फसवणूक आणि अकार्यक्षमतेने ग्रस्त असल्यामुळे, त्याचे निराकरण करण्यासाठी नवीन गोल्ड कार्ड व्हिसा आणण्याचे ट्रम्प यांचे उद्दिष्ट आहे. EB- 5 व्हिसाप्रमाणे, हा व्हिसा गुंतवणूकदाराला कायमस्वरुपी कायदेशीर निवासस्थान देऊ करेल आणि नागरिकत्वाचा मार्ग खुला करुन देईल.