24 C
Mumbai
Monday, November 25, 2024
घरदेश दुनियाकाय आहे इस्रायमधल्या 'मायबोली' मराठी मासिकाची कथा?

काय आहे इस्रायमधल्या ‘मायबोली’ मराठी मासिकाची कथा?

Google News Follow

Related

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी रविवारी इस्रायलमधील भारतीय ज्यू समुदायाशी संवाद साधला. जेथे त्यांनी भारतीय ज्यू समुदायाच्या इस्रायलवर झालेल्या मोठ्या प्रभावाचे कौतुक केले. जयशंकर म्हणाले की, “हा समुदाय भारत आणि इस्रायलला जोडणारी एक नाळ आहे. त्याचबरोबर इस्रायलमध्ये सुरु असलेल्या मायबोली या मराठी मासिकाबद्दलही मला सांगण्यात आले आहे.

“भारतीय ज्यू समुदायाने भारतातील काही स्वाद इस्रायलमध्ये नेले जे त्यांनी कायम ठेवले आहेत. काही स्वरूपात इस्रायलनेही आत्मसात केले आहे. मला सांगण्यात आले आहे, उदाहरणार्थ, बेने इस्रायलींनी बनवलेली विशिष्ट मलिदा थाली – आणि मलिदा आता अधिकृतपणे इथल्या स्थानिक दिनदर्शिकेत समाविष्ट करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, बेने इस्रायलींमध्ये मंगळसूत्र आणि मेहंदीचा प्रभाव, बाट पुक्काची प्रथा बगदादी ज्यूंमध्ये विवाह औपचारिक करण्यासाठी, आणि तोराहला चमेलीच्या हारांसह सुशोभित करण्यासाठी आणि कोचिनी ज्यूंनी मनाराचा वापर केला.” असं एस. जयशंकर म्हणाले.

“तुम्ही सभास्थानात प्रवेश करण्यापूर्वी चपला, बूट काढण्याची तीच भारतीय परंपरा देखील स्वीकारली. तुम्ही सर्वांना आमची जीवनपद्धती, आमची भाषा, आमचे सण आत्मसात केले आहेत.” असेही ते पुढे म्हणाले.

सणांविषयी बोलताना जयशंकर म्हणाले की, “ओणम, होळी आणि दिवाळी हे इस्रायलमध्ये पुरीम आणि हॉनीकासह साजरे केले जातात. सांस्कृतिक आणि धार्मिक संबंधांचा हवाला देत जयशंकर यांनी दोन्ही सभ्यतांमधील (हिंदू आणि ज्यू) प्राचीन भारतीय ज्यूंच्या भारताच्या राष्ट्रनिर्मिती प्रक्रियेत दिलेल्या योगदानाचे वर्णन केले आणि कौतुक केले.”

हे ही वाचा:

ठाकरे सरकार म्हणजे, ‘अलीबाबा आणि चाळीस चोर’

हिंदू राष्ट्र मजबूत करण्यासाठी राज ठाकरे जाणार अयोध्येला

सामाजिक न्याय विभागाच्या उपायुक्ताच्या घरी सापडले एक कोटी

‘संजय राऊत यांचे गांजावर इतके प्रेम बरे नाही!’

“जेरुसलेमशी भारताचे संबंध ८०० वर्षांपूर्वीचे आहेत. आमचे एक आदरणीय सूफी संत बाबा फरीद यांनी जेरुसलेममधील शहराच्या भिंतींच्या आत एका गुहेत ध्यान केले. हे ठिकाण नंतर भारतातील प्रवाशांसाठी एक तीर्थस्थान आणि तीर्थक्षेत्र बनले आहे.” असं जयशंकर म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
196,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा