35 C
Mumbai
Saturday, November 2, 2024
घरदेश दुनियासध्याच्या इस्रायल-पॅलेस्टाईन वादातील हमास म्हणजे नक्की काय?

सध्याच्या इस्रायल-पॅलेस्टाईन वादातील हमास म्हणजे नक्की काय?

Google News Follow

Related

सध्याच्या घडीला इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे एक नाव चर्चेत आलंय ते म्हणजे हमास. मात्र असं काय झालं ज्यामुळे हमासची चर्चा होऊ लागली आणि त्याचा या सर्व युद्धजन्य परिस्थितीशी काय संबंध. याबद्दलच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

हमास नेमकं काय?

हमास ही पॅलेस्टाईनची सर्वात मोठी इस्लामी कट्टरतावादी संघटना आहे, ज्याची निर्मिती १९८७ सालच्या आंदोलनावेळी झाली. या भागातील इस्रायली सेनेला हटवणं हाच गेल्या तीन दशकांपासून लढणाऱ्या हमासचं मुख्य उद्देश आहे.

हमासचं पूर्ण नाव हरकत अल मुकावमा अल इस्लामिया आहे. याचाच अर्थ इस्लामिक रिजिस्टन्स मुव्हमेंट. रिजिस्टन्स म्हणजे प्रतिकार किंवा विरोध. या संघटनेची निर्मिती शेख अहमद यासीन या पॅलेस्टाईनच्या मौलानाने केली होती. तो इजिप्तच्या मुस्लिम ब्रदरहूड या पॅलेस्टिनी शाखेचा भाग होता. हमासच्या निर्मितीची वेळ फार महत्त्वाची मानली जाते. डिसेंबर १९८७ मध्ये जेव्हा हमासची निर्मिती झाली. त्यावेळी पॅलेस्टाईनमध्ये इंतिफादाचीही सुरुवात झाली. इंतिफादा हा एक अरबी शब्द आहे ज्याचा अर्थ आहे उलथापालथ घडवणे. पॅलेस्टाईनमध्ये सुरु झालेल्या इंतिफादा चळवळीचा उद्देश होता की इस्रायलपासून मुक्ती मिळवणं. त्यांचं मुख्य लक्ष्य होतं ते वेस्ट बँक, गाझा आणि पूर्वी जेरुसलेमला इस्रायलच्या ताब्यातून सोडवणं.

१९८७ च्या या चळवळीला फर्स्ट इंतिफादा म्हणूनही ओळखलं जातं. याला भडकवण्याचं तत्कालीन कारण होतं गाझा चेकपोस्टवर झालेली एक घटना. याठिकाणी एक पॅलेस्टेनियन लोकांचा समूह आंदोलन करत होता. इस्रायली सैनिकांनी त्यांच्यावर गोळीबार केला, ज्यात चार पॅलेस्टॅनियन मारले गेले. यानंतर साऱ्या पॅलेस्टाईनमध्येच आंदोलन सुरु झालं. या घटनेपर्यंत पॅलेस्टिनी हत्यारांविनाच लढत असत. विरोध करण्याचं त्यांचं मुख्य हत्यार होतं ते म्हणजे दगडफेक करणं. याच पार्श्वभूमीतून हमासची निर्मिती झाली. १९८८ मध्ये हमासने आपलं चार्टरही जाहीर केलं. इस्रायला विनाश आणि पॅलेस्टाईनच्या ऐतिसाहिक भूभागावर इस्लामिक सोसायटीची स्थापना ही मुख्य ध्येयं हमासनं स्थापनेवेळी ठेवली.

हे ही वाचा:

आता बँक बुडाली तरी ठेवीदारांना चिंता नाही, मोदी सरकारचा नवा नियम

ठाकरे सरकारने मराठा आरक्षणाचा मुडदा पाडला

मुख्यमंत्र्यांची टास्क फोर्ससोबत बैठक

अतुल्य भारताचा सन्मान करा, ‘या’ ऑस्ट्रेलियन खेळाडूने मीडियाला सुनावले

याचदरम्यान आंतरराष्ट्रीय स्तरावर इस्रायल आणि पॅलेस्टाईनचा वाद मिटवण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. मोठ्या चर्चेनंतर १९९३ मध्ये दोन मोठ्या गोष्टी घडल्या ज्यात पहिली होती. पॅलेस्टाईनच्या नेतृत्त्वाकडून इस्रायलला मान्यता देणं आणि दुसरं होतं गाझा आणि वेस्ट बँकमध्ये स्वत:च्या शासनासाठी पॅलेस्टिनींना अंतरिम सरकारवर करार. या करारावर इस्रायलकडून पंतप्रधान यितझाक रॉबिन यांनी तर पॅलेस्टाईनकडून यासिर अराफात यांनी स्वाक्षऱ्या केल्या. अराफात पीएलओ या पॅलेस्टिनी स्वातंत्र्य चळवळीतील एक प्रमुख संघटना होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
186,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा