काय आहे सीडीएस बिपीन रावत यांनी सांगितलेला ‘संस्कृतींचा संघर्ष’?

काय आहे सीडीएस बिपीन रावत यांनी सांगितलेला ‘संस्कृतींचा संघर्ष’?

सीडीएस बिपिन रावत यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात असे सांगितले की, अफगाणिस्तानमध्ये सुरू असलेल्या घटनाक्रमातून चिनी संस्कृती आणि इस्लामिक संस्कृती समन्वयातून पश्चिमी संस्कृती विरुद्ध लढायला एकत्र येत आहेत. जनरल रावत यांच्या या वक्तव्याचा नेमका अर्थ काय हे समजून घेऊ…

पश्चिमी देशांची संस्कृती ही ग्रीक, रोमन आणि नंतर विकसित झालेली युरोपियन संस्कृती आहे. सुरुवातीच्या काळात अत्यंत क्रूर, पाशवी आणि रानटी असलेली ही संस्कृती कालांतराने सभ्य संस्कृतीचा भाग झाली. पश्चिमी देशांच्या संस्कृतीमध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा काळ म्हणजे रेनेसान्स. या रेनेसान्समध्ये, ख्रिश्चन सांप्रदायिक झापडं लावलेल्या पश्चिमी देशांमध्ये पुन्हा एकदा विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा सन्मान करण्याची आणि त्याचा अभ्यास करण्याची प्रवृत्ती उदयाला आली. कालांतराने औद्योगिक क्रांतीनंतर पश्चिमी देशांनी सुख, समृद्धी आणि भरभराट पाहिली. पश्चिमी देशांच्या या भरभराटी नंतर जगभर पश्चिमी देशांचा दबदबा राहिला.

इस्लामच्या उदयानंतर मध्यपूर्व आशिया इराण आणि उत्तर आफ्रिका या भागामध्ये इस्लामच्या नावाखाली वेगळी राजकीय मोट बांधली गेली. संपूर्ण इस्लामिक जगतामध्ये धर्म वेडाने पिसाटलेले अनेक क्रूर आक्रमक आफ्रिका आणि आशियातील या बहुतांश भागांमध्ये गेले. काही शतकं जगाच्या मोठ्या भूभागावर राज्य केल्यानंतर, इस्लामिक साम्राज्याचा आणि प्रभावाचा अस्त होऊ लागला. कालांतराने इस्लामिक राज्यांमध्ये सामाजिक प्रगती खुंटली आणि जगात लोकशाही चा प्रसार होत असताना सर्व इस्लामिक देशांमध्ये हुकुमशाही पसरली.

१९५० साली चीनमध्ये माओने केलेल्या रक्तरंजित क्रांती नंतर चीन पुन्हा एकदा स्वतःला जागतिक पटलावर प्रस्थापित करायला लागला. माओच्या आर्थिक धोरणांमुळे चीनची अवस्था अत्यंत वाईट झाली आणि पुढची तीस वर्ष चीन गरिबी आणि उपासमारी मध्ये अडकून पडला. परंतु त्यानंतर डेंग जाओपिंग यांच्या नेतृत्वात चीनने पुन्हा भरारी घेतली आणि आज चीन जगातली दुसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आहे. चीनच्या आर्थिक प्रभावाच्या जोरावरच चीन पुन्हा एकदा स्वतःला महासत्ता म्हणून प्रस्थापित करू पाहत आहे. परंतु पश्चिमी देशांच्या प्रभावाला कमी करण्याइतकी आजही चीनची ताकद वाढलेली नाही. त्यामुळेच इस्लामिक देशांची आणि विशेषतः हुकुमशाही असलेल्या इस्लामिक देशांशी चीन हातमिळवणी करून पश्चिमी देशांना, लोकशाही असलेल्या देशांना पदच्युत करू पाहतो आहे.

चीनच्या आणि इस्लामिक देशांच्या या युतीचा उल्लेख जनरल रावत यांनी केला आहे. काही महिन्यांपूर्वी फ्रान्समध्ये इस्लामिक दहशतवादाने थैमान घातल्यानंतर त्या देशातही इस्लामो फाशिस्म ही संकल्पना उदयाला आली होती. जनरल रावत हे देखील नाव न घेता याच प्रवृत्तीचा उल्लेख करताना दिसतात. भारतीय लष्कराच्या सर्वोच्च पदावर असलेली व्यक्ती इतक्या बारकाईने आणि इतक्यात प्रगल्भतेने जगाच्या बदलत्या राजकारणाचा, इतिहासाचा आणि संस्कृतींचा अभ्यास करते ही भारतासाठी भाग्याची गोष्ट आहे. याच बरोबर चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना भेटल्यानंतर भारतीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी भारत अशा पद्धतीच्या संस्कृतींच्या लढाईवर विश्वास ठेवत नाही असे विधान केले. परंतु याचा अर्थ परराष्ट्र मंत्रालय आणि लष्करामध्ये मतभेद आहेत असं समजण्याचं कारण नाही. परराष्ट्र मंत्री या नात्याने चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांशी ज्या भाषेत बोलणे योग्य आहे, जे बोलल्याने भारताचा फायदा होणार आहे ते परराष्ट्र मंत्री जयशंकर बोलले. त्याचबरोबर ज्यामुळे भारताला आणि भारत यांना जगामध्ये सुरू असलेल्या सांस्कृतिक संघर्षाची जाणीव होईल ते जनरल रावत बोलले.

हे ही वाचा:

५ ते ११ वयोगटासाठी फायझरची नवी लस लवकरच उपलब्ध होणार

अमेरिकेने जीव वाचवून पळ काढला

काँग्रेस शासित राजस्थानमध्ये हिंदू मुलाचे ‘लिंचिंग’

तक्रारदार स्थानबद्ध तर गावगुंड राज्यभर मुक्त

चीनी संस्कृती, इस्लामिक संस्कृती यांच्यातील हातमिळवणी आणि पश्चिमी राष्ट्रांच्या संस्कृतीला आव्हान देण्याच्या या संघर्षामध्ये भारताची भूमिका काय असेल हे येणारा काळच ठरवेल.

Exit mobile version