वॅग्नरच्या बंडानंतर झेलेन्स्की काय म्हणाले?

ट्वीट करत पुतीन यांना सुनावले

वॅग्नरच्या बंडानंतर झेलेन्स्की काय म्हणाले?

रशिया आणि युकीन या दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू असून रशियामध्ये नवं संकट उभं राहिलं आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांच्या विशेष मर्जीतील मानल्या जाणाऱ्या ‘वॅगनर ग्रुप’ने बंड केला आहे. युक्रेन विरुद्धच्या लढ्यात पुतीन यांनी या सैन्याचा वापर केला होता. मात्र, वॅग्नरने रशियात बंड केलं असून रशियात नवीन राष्ट्राध्यक्षांची नियुक्ती करण्याची घोषणाच वॅग्नरचे प्रमुख झिबिग्नी प्रिगोझिव्ह यानं केली आहे. या परिस्थितीवर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे.

“ज्यांनी दुष्ट वृत्तीचा मार्ग स्वीकारला, त्यांनी शेवटी स्वतःचाच विनाश ओढवून घेतला आहे. इतर देशात सैन्य पाठवणारे आणि समोर संकट उभं राहिल्यानंतर त्यापासून पळ काढणाऱ्या सैन्याला रोखू न शकणाऱ्यांचे हेच होते. जो इतरांना क्षेपणास्त्रांनी घाबरवण्याचा प्रयत्न करतो, ते आम्ही पाडल्यानंतर स्वतःवरच ड्रोन हल्ल्याचा कांगावा करतो त्याचं हेच होणार. जो लाखो नागरिकांना युद्धामध्ये लोटतो आणि शेवटी स्वतःच त्याच्याच सैन्यापासून बचावासाठी मॉस्कोमध्ये कोंडून घेतो, त्याचं हेच होणार,” असं झेलेन्स्की यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

“रशियाचा हा कमकुवतपणा हे तर अगदी साहजिक होतं. हा सरळ सरळ कमकुवतपणाच आहे. आता रशिया जितका अधिक काळ युक्रेनमध्ये त्यांचं सैन्य आणि हे भाडोत्री सैनिक ठेवेल, तेवढा जास्त गोंधळ, दु:ख आणि अडचणींचा सामना रशियाला करावा लागेल. हे तर साहजिकच आहे. रशियाच्या दुष्ट आणि गोंधळाच्या धोरणांपासून युरोपचं संरक्षण करण्यासाठी युक्रेन समर्थ आहे”, असं झेलेन्स्की म्हणाले आहेत. “गेल्या कित्येक वर्षांपासून रशियानं आपला कमकुवतपणा व मूर्खपणा लपवला आहे. आता तिथे एवढा गोंधळ झालाय की कोणताही खोटारडेपणा हा गोंधळ लपवू शकत नाही. आणि हे सगळं एका व्यक्तीमुळे होत आहे,” असंही झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा:

उद्धव ठाकरे म्हणतात मेहबुबा मुफ्ती यांच्या शेजारी मुद्दाम बसलो

जामिनासाठी रचला बनाव; पत्नीला मेंदूचा आजार पण दाखविली हाडाची शस्त्रक्रिया!

अमेरिकेच्या यशस्वी दौऱ्यावरून पंतप्रधान मोदी इजिप्तला रवाना

सगळ्या विमान कंपन्यांना हवेत गुणवत्तावान वैमानिक; वाढणार घसघशीत पगार

रशियात नेमकं काय घडतंय?

राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी तयार केलेल्या वॅग्नर या ग्रुपनं आत्तापर्यंत पुतिन यांना सर्व प्रकारच्या कारवायांमध्ये साथ दिली. रशियाने सुरू केलेल्या युक्रेन युद्धातही वॅग्नर ग्रुप रशियन सैन्याच्या बरोबरीने युद्धात उतरला होता. मात्र, याच काळात या दोन्ही सैन्यामध्ये काही वाद झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर वॅग्नर ग्रुपने हा निर्णय घेत बंड पुकारला आहे. वॅगनर ग्रुप पुतिन यांची सर्वात मोठी ताकत समजला जायचा. पण आता हाच ग्रुप पुतीन यांच्या विरुद्ध उभा राहिला आहे. आम्ही मॉस्कोपर्यंत जाणार, मध्ये कोणी आम्हाला अडवण्याचा प्रयत्न केला, तर सोडणार नाही, असं वॅगनर प्रमुखांकडून सांगण्यात आलं आहे.

Exit mobile version