25 C
Mumbai
Friday, December 20, 2024
घरदेश दुनियातालिबानपासून वाचवण्यासाठी मुलांना का फेकत आहेत महिला?

तालिबानपासून वाचवण्यासाठी मुलांना का फेकत आहेत महिला?

Google News Follow

Related

अफगाणिस्तानमध्ये तालिबानने कब्जा केल्यानंतर तालिबानच्या अनेक अनन्वित छळांचे व्हिडिओ समोर आले आहेत. यामध्ये हिंदू, शीख यांच्यासारखे अल्पसंख्यांक तसेच महिला आणि मुलांना सर्वाधिक जाच सहन करावा लागत आहे. यामुळे अफगाण महिला आपल्या मुलांना वाचवण्यासाठी काय टोकाची पावलं उचलावी लागत आहेत, हे पाहून कोणत्याही सहृदय व्यक्तीला नक्कीच वेदना होतील.

स्काय न्यूजमधील एका अहवालात विमानतळावर उभ्या असलेल्या गार्डच्या अनुभवांचे वर्णन केले आहे. ब्रिटीश लष्कराचा एक वरिष्ठ अधिकारी अगदी म्हणतो की त्यांची लष्करी टीम महिलांची ही पावले पाहून खूप दुःखी आहे. “हे धोकादायक आहे. महिला स्वतःच्या मुलांना घेऊन काटेरी तारा ओलांडत होत्या आणि सैनिकांना पकडण्यास सांगत होत्या. काही मुले तारांमध्ये अडकत होती,” अधिकारी म्हणाले.

बचाव कार्य चालवणाऱ्या सैनिकांनी विमानतळावरील भयानक दृश्यांचा उल्लेख केला आहे. काही रक्षकांचे म्हणणे आहे की महिला आपल्या मुलांना काटेरी कुंपणावरून विमानतळावर प्रवेश करण्यासाठी फेकत आहेत आणि दुसरीकडे सैनिक त्यांना पकडण्याचे आवाहन करत आहेत.

“काबुल विमानतळामध्ये घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीवर तालिबानच्या व्यक्तीने गोळीबार केला. या व्यक्तिला तालिबानी मागील सरकारच्या पोलिसांप्रमाणे वागतील असं वाटलं, पण तालिबानी वेगळीच भाषा (बंदुकीची) बोलतात.” असं एका स्तहनिक वृत्तवाहिनीने सांगितले आहे.

हे ही वाचा:

बूस्टर डोसबद्दल डब्ल्यूएचओने केले ‘हे’ महत्वाचे वक्तव्य

अफगाणिस्तानमध्ये लोकशाही नाही तर, केवळ शरिया

उद्धवचा काळ संपला, लवकरच भाजपाची सत्ता येणार

शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचा भाजपात प्रवेश

अफगाणिस्तानावर ताबा मिळवल्यानंतर तालिबान्यांनी आता महिला वृत्त निवेदिकांवर बंदी घातली आहे. सरकारी न्यूज चॅनलच्या एका महिला वृत्त निवेदिकेला तालिबान्यांनी नोकरीवरुन काढून टाकलं आहे. कालच तालिबानने एका महिला वृत्त निवेदिकेला मुलाखत दिल्याची बातमी समोर आली होती, परंतु आज तालिबानने खरे रंग दाखवत महिलांना पुन्हा एकदा महिला वृत्त निवेदिकांवर बंदी आणली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा