वेस्ट इंडियन क्रिकेटपटूने मानले पंतप्रधान मोदींचे आभार.

वेस्ट इंडियन क्रिकेटपटूने मानले पंतप्रधान मोदींचे आभार.

एकीकडे कोरोनाने सारे जग त्रस्त असताना भारतीय बनावटीच्या लसी या अनेक देशांसाठी संजीवनी ठरत आहेत. भारताने ‘व्हॅक्सिन मैत्री’ निभावताना जगातील जवळपास सत्तर देशांना लस पुरवली आहे. या सर्वच देशातून भारताविषयी आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी कृतज्ञता व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान मोदींवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

बुधवारी वेस्ट इंडिजच्या एका क्रिकेटपटूने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. भारताने जमैका या देशाला कोरोनावरची लस पुरवली म्हणून त्याने भारताचे आभार मानले आहेत. हा क्रिकेटपटू म्हणजे वेस्ट इंडिज संघाचा स्फोटक अष्टपैलू क्रिकेटपटू आंद्रे रसेल. ‘इंडिया इन जमैका’ या ट्विटर हॅन्डलने रासेलचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

हे ही वाचा:

वाझे प्रकरणात शिवसेना एकाकी, मित्रपक्ष झाले आक्रमक

सचिन वाझेला मुंबई पोलिसांपासून वाचवा, अन्यथा त्यांचा मनसुख हिरेन होईल

ममतांच्या ‘खेला होबे’ला मोदींच्या ‘विकास होबे’ने उत्तर

राजकीय भूकंपाची शक्यता, दोन मंत्र्यांची होणार एनआयएकडून चौकशी?

या व्हिडिओमध्ये रसेल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जमैकातील भारतीय हाय कमिशनचे आभार मानताना दिसत आहे. “मला साऱ्या जगाला पुन्हा पूर्ववत झालेले बघायला आवडेल आणि त्या बदलासाठी व्हॅक्सीन महत्वाचे आहे.” असे रसेल म्हणाला आहे. भारत आणि जमैका फक्त एकमेकांच्या जवळ नसून ते एकमेकांचे भाऊ आहेत असे देखील रसेल म्हणाला.

वेस्ट इंडिजचा आंद्रे रसेल हा अष्टपैलू खेळाडू आपल्या आक्रमक खेळाने कायमच प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतो. इंडियन प्रिमियर लिगमध्ये तो कोलकाता नाईट रायडर्स संघाचे प्रतिनिधित्व करतो. रसेलचे भारतात अनेक चाहते आहेत.

Exit mobile version