‘हमासचा निःपात करण्याची शपथ घेतली आहे, ती पूर्ण करूच’

बेन्जामिन नेतान्याहू यांचे अमेरिकेला सांगणे

‘हमासचा निःपात करण्याची शपथ घेतली आहे, ती पूर्ण करूच’

‘आम्ही हमासचा निःपात करण्याची शपथ घेतली असून कोणीही आम्हाला रोखू शकणार नाही,’ असे ठाम प्रतिपादन इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांनी शुक्रवारी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांच्याकडे केले. ब्लिंकन यांनी जेरूसलेम येथील इस्रायलच्या पंतप्रधानांच्या कार्यालयात नेतान्याहू यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
जेरूसलेममध्ये हमासच्या दोन दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात तीनजण ठार झाल्यानंतर लगेचच ही बैठक झाली. हमासने केलेल्या या गोळीबारात आठ जण जखमी झाले आहेत.

उभयतां दोन्ही नेत्यांनी अजूनही हमासच्या ताब्यात असलेल्या ओलिसांच्या सुरक्षित सुटकेसाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांबाबत चर्चा केली. तसेच, गाझामध्ये मानवतेच्या भूमिकेतून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याचा वेग वाढवण्यासंदर्भातही त्यांनी काही मुद्द्यांचा परामर्श घेतला. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केलेल्या निवेदनात याबाबतची माहिती देण्यात आली.

हे ही वाचा:

अबब! मोबाईल नाहीतर अख्खा मोबाईल टॉवरच गेला चोरीला!

रस्त्याच्या कडेला थांबलेल्या ट्रकला मिनिबस धडकली, आठ ठार!

पोयसर नदी रुंदीकरणातील बाधितांना याच परिसरात मिळाली घरे!

कुठे गेली पाकिस्तानमधून आलेली अंजू? मुलांनीही भेटण्यास दिला नकार

दक्षिण गाझा येथे कोणतीही लष्करी कारवाई करण्यापूर्वी मानवतावादी आणि नागरी संरक्षण सुनिश्चित करण्यावर अँटनी ब्लिंकन यांनी भर दिला. त्यांनी इस्रायली पंतप्रधानांना वेस्ट बँकमधील पॅलेस्टिनींवरील हिंसाचारासाठी स्थानिक अतिरेक्यांना जबाबदार धरण्याकरिता त्वरित पावले उचलण्याची विनंती केली. तसेच, इस्रायलसह पॅलेस्टाइन राज्यातही शांतता, स्वातंत्र्य आणि सुरक्षेची भावना नांदावी, यासाठी मूर्त पावले उचलण्याच्या अमेरिकेच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. तसेच, ब्लिंकन यांनी आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्याचे पालन करून दहशतवाद्यांच्या हिंसेपासून स्वतःचे संरक्षण करण्याच्या इस्रायलच्या हक्कांना असलेल्या अमेरिकेच्या पाठिंब्याचा पुनरुच्चार केला.

 

अमेरिकेच्या परराष्ट्र सचिवांनी इस्रायलचे राष्ट्रपती आयझॅक हर्झॉग आणि देशाच्या युद्ध मंत्रिमंडळाचीही भेट घेतली. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धविरामाचा कालावधी गुरुवारी शेवटच्या क्षणी वाढवण्यात आला आहे. पॅलेस्टिनी कैद्यांच्या बदल्यात गाझा पट्टीमध्ये कैद असलेल्या ओलिसांची सुटका करण्यासाठी अजून वाटाघाटी सुरू आहेत.

Exit mobile version