भारताने केलेली मदत कधीही विसरणार नाही- ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान

भारताने केलेली मदत कधीही विसरणार नाही- ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात कोविड-१९ संकटावर फोनवर चर्चा जाली. याबाबत माहिती देताना मॉरिसन यांनी ट्विट केलंय. ते म्हणाले, “माझे मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा झाली. त्यांनी कोविड-१९ संकटात भारतासोबत उभे राहिल्याबद्दल ऑस्ट्रेलियाचे आभार मानले. ऑस्ट्रेलिया व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन कंसंट्रेटर देऊन भारताला मदत करत आहे. आम्ही कोरोना लसीच्या निर्यातीमध्ये भारताने दाखवलेली उदारता कधीही विसरु शकणार नाही. जागतिक आव्हानांवर आमचं बारकाईने लक्ष आहे.

भारत सध्या कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. यात दररोज ३-४ लाख नव्या कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. दर दिवशी ३ हजारपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू होत आहे. भारतात सापडलेल्या नव्या कोरोना विषाणूंच्या व्हेरिएंटमुळे कोरोना संसर्गाने रौद्र रुप धारण केल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणजे तब्बल एक वर्ष होऊन गेलंय तरीही सरकारकडून कोरोना रुग्णांना पुरेशा वैद्यकीय सोयीसुविधा पुरवण्यात अपयश येत आहे. अनेक ठिकाणी बेड, औषधं, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन इत्यादीची उपलब्धताच नाही. त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय. या पार्श्वभूमीवर जगातील जवळपास ४० देशांनी भारताला मदत देऊ केलीय. यात ऑस्ट्रेलियाचाही समावेश आहे.

हे ही वाचा:

महाराष्ट्रात सापडले ५३,६०५ नवे कोरोना रुग्ण

पीएम केअर्समधून मिळालेले ६० व्हेंटिलेटर्स धूळ खात पडून

कोविड पाठोपाठ बळावतोय आणखी एका आजाराचा धोका

धक्कादायक……!! कालव्यात सापडली शेकडो रेमडेसिवीर इंजेक्शने!!

२ दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री मॅरिस पेन यांनी ट्विट करत ऑस्ट्रेलिया या संकटाच्या काळात भारतासोबत असल्याचं म्हटलं. तसेच व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन कंसंट्रेटर्सची पहिली खेप विमानाने पाठवली जात असल्याचंही त्यांनी नमूद केलं. यानंतर भारत सरकारकडूनही लगेचच ट्विट करत आभार मानले होते. ऑस्ट्रेलियामधील भारतीय उच्चायोगाने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, “जागतिक साधीरोगाविरोधात लढण्यासाठी योग्यवेळी मदत केल्याबद्दल पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि मंत्री मॅरिस पायने यांचे आभार.”

Exit mobile version